डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. यवत येथील भिम नगर मध्ये. वर्षावास कार्यक्रम संपन्न.
By : Polticalface Team ,20-08-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २० ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिम नगर येथे पंचशील तरुण मंडळाच्या वतीने दि १८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे दौंड तालुका अध्यक्ष संजय गायकवाड. बौद्धाचार्य गौतम भालेराव तसेच दादा मोरे धम्म सेवक संपत फणसे आदी बौद्ध उपासक उपासिका वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे दौंड तालुकाध्यक्ष संजय गायकवाड. बौद्धाचार्य गौतम भालेराव. तसेच दादा मोरे. धम्म सेवक संपत फणसे आदी उपस्थित मान्यवरांना स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले. बौद्ध धर्मातील संस्कृतीचे आचरण बौद्ध उपासक व उपासिकींनी करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले. तसेच बौद्ध धम्म हा याच भारतातील धर्म असुन पूर्वकालीन इतिहास पाहता सम्राट अशोकाच्या काळात ८४ हजार स्तूप व बुद्ध विहार बांधल्याचे शिला लेखातून सिद्ध होत आहे. भारतातील कोणत्याही ठिकाणी काना कोपऱ्यात उत्खनन केल्यास तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती आढळून येत आहेत.
वर्षावास हा बौद्ध धम्मातील विज्ञानवादी व स्वजवळ ज्ञान मार्ग आहे. बौद्ध उपासक उपासिकींना धम्म संस्कृतीच्या माध्यमातून ज्ञान प्रसार करण्याचा पवित्र महिना आषाढ पौर्णिमेपासून सुरू करण्यात येतो. तीन महिन्याच्या काळात पावसाळा असल्याने तत्पूर्वी बौद्ध धम्मातील भिकू संघ. ठिक ठिकाणी निवास करुन बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करत असे हि परंपरा आजही कायम जोपासली जात आहे.
या कालावधीत भिक्खू संघ बौद्ध धम्मातील ग्रंथांचे वाचन करून बौद्ध उपासक उपासिकांना धम्म प्रबोधन करण्याचे कार्य करत असतात. प्रत्येक अनुयायांनी पंचशीलाचे पालन करावे. अष्टांगिक मार्गाने आपले जीवन जगावे. सर्व प्राणी मात्रांवर करुणा करावी. सर्वांशी मैत्री भावना ठेवावी. दान पारमिताचे आचरण करावे. अनाचारापासून आलीप्त रहावे अशी जन कल्याणकारी शिकवण तथागत गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून दिली असल्याची. भारतीय बौद्ध महासभेचे दौंड तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी उपस्थित बांधवांना जाणीव करून दिली. यावेळी बौद्धाचार्य गौतम भालेराव यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या सूक्त पिटकातील महत्वाच्या विषयावर उपस्थित बौद्ध अनुयायांना प्रवचन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा मोरे यांनी केले. या प्रसंगी यवत येथील पंचशील तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वाचक क्रमांक :