स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,20-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड तालुक्यातील बोरीपर्धी चौफुला ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री बोरमलनाथ मंदिर या ठिकाणी आमदार अँड राहुल कुल यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबीर दि १९ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी असून मी गेल्या दहा वर्षात आरोग्य कामांसाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी बोलताना सांगितले ते बोरीपर्धी (ता. दौंड) येथील बोरमलनाथ मंदीर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की, स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असताना दौंड तालुक्याचा आमदार झाल्या पासून आरोग्याच्या बाबतीत काम करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा वर्षात आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम करण्यात मला माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने यश आलं आहे तसेच कोरोना कालावधीत देखील आम्ही मोठं काम उभे केले परंतु त्याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. यापुढील काळात देखील आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करू असे त्यांनी सर्व रुग्णांना अश्वस्त केले.
या शिबिरात सुमारे १३ हजार ८०० रुग्णांची नोंदणी व तपासणी झाली असून, तपासणी ते संपूर्ण उपचार आशा प्रकारचे हे शिबिर आहे. पुण्यातील ५० हुन अधिक नामांकित हॉस्पिटलांनी या महाआरोग्य शिबिरात सहभाग घेतला होता. यामध्ये सुमारे ३००० हुन अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सुमारे ८०० दिव्यांगाना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक जाधव यांनी केले.
यावेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भिमा पाटसचे कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माऊली ताकवणे. धनाजी शेळके, तुकाराम ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला. तहसीलदार अरुण शेलार. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी केले तर आभार उमेश देवकर यांनी मानले .
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष