पद्मश्री नामदेव ढसाळ दलित पँथरच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी आबासाहेब शिंदे यांची निवड. राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.
By : Polticalface Team ,22-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २२ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र राज्यातील दलित पँथर संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ. या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी आबासाहेब शिंदे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र
देण्यात आले आहे. दलित पँथर संघटना वंचित बहुजन समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारे संघटन म्हणून सर्वश्रुत आहे.
देशातील व राज्यातील अनेक आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व या संघटनेच्या माध्यमातून उदयास येऊन घडविले आहेत. यावेळी नडघम यांनी संघटनेची ध्येय धोरणं आणि संघटनात्मक कार्या बाबत उपस्थितांना माहिती देऊन नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
येणाऱ्या काळात संघटना अधिक मजबूत करून सर्व सामान्य तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन आबासाहेब शिंदे यांनी बोलताना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून वंचित समाज घटकांना न्याय मिळावा. या साठी राज्यभर विविध सामाजिक चळवळींच्या माध्यमातून कार्यरत आहे. राज्यात मोठ्या संख्येने युवा तरुण कार्यकर्ते आहेत. राज्यात नावलौकिक असलेले संघर्ष नायक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी विचाराचा वारसा पुढे घेऊन दलित पँथरचे संघटन अधिक मजबूत होईल. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी राज्यातील दलित पँथर संघटनेचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :