पाटस टोल प्लाझा फक्त टोल वसुली करणार काय ? पुणे सोलापूर नॅशनल हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष. यवत सारखी ड्रेनेज लाईन महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही.

By : Polticalface Team ,25-09-2024

पाटस टोल प्लाझा फक्त टोल वसुली करणार काय ? पुणे सोलापूर नॅशनल हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष. यवत सारखी ड्रेनेज लाईन महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता २६ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर नॅशनल महामार्गावरील असलेल्या सेवा मार्गा लगत दोन्ही बाजूने केलेली ड्रेनेज लाईन संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही. नॅशनल हायवे प्रशासनाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च करून ही ड्रेनेज लाईन नागरिकांच्या सोयीसाठी बनवण्यात आली आहे. की ठेकेदाराच्या फायद्यासाठी या बाबत नागरिकांना प्रश्न पडला आहे. पुणे सोलापूर नॅशनल हायवे महामार्गावरील मौजे यवत येथील नागरिकांची लोकसंख्या पाहता. पुणे सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी लोकांची अधिक वर्दळ दिसून येते. हायवे मार्गावर दोन्ही बाजूने लोखंडी ब्रॅकेट लावल्याने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर एकाच भुयारी मार्ग ठेवल्याने नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे.‌ या बाबत यवत व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अनेक वेळा नॅशनल हायवे प्रशासन अधिकारी यांच्या कामकाजा बाबत प्रश्न उपस्थित करून नाराज व्यक्त केली आहे. यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर एकमेव भुयारी मार्ग असल्याने फोर व्हीलर टू व्हीलर वाहन वाहतूक व नागरिकांसह विद्यार्थी मुलं देखील याच मार्गाने वाटचाल करत असतात. गेली अनेक वर्षा पासून भुयारी मार्ग पी एम पी एल बस स्टॉप या ठिकाणी पावसाचे पाणी गुडघाभर साठत असल्याने वेळोवेळी संबंधित ठेकेदार हे किरकोळ दुरुस्ती व डागडूजी करून स्थानिक नागरिकांची व नॅशनल हायवे प्रशासनाची दिशाभूल करत आहे. सदर ड्रेनेज लाईन चे काम जशाचे तसेच दिसून येत आहे. यवत येथील या ड्रेनेज लाईन बाबत सांगायचे झाले तर ? उन्हाळा आला की घर बांधू या पुस्तकातल्या माकडाच्या गोष्टी प्रमाणे झाले आहे. पावसाळा संपला की याकडे कोणाचे लक्ष जात नाही. पुन्हा पावसाळा आला की येरे माझ्या मागल्या हि परिस्थिती निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. असं किती दिवस चालणार. नॅशनल हायवे प्रशासन अधिकारी या बाबत काही ठोस निर्णय घेतील की नाही. यवत येथील हायवे मार्गाच्या दोन्ही बाजूंने देखावा प्रमाणे नावाला केलेली ड्रेनेज लाईन प्रमाणिक पणे दुरुस्ती केली जाईल का ? असा प्रश्न उपस्थित करून स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. यवत येथील पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा मार्ग लगत असलेल्या दोन्ही बाजूच्या ड्रेनेज लाईन सेवा मार्गापेक्षा उंच करून निकृष्ट दर्जाचे वीट बांधकाम केले आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात महामार्गावरील पावसाचे पाणी ड्रेनेजमध्ये न जाता सेवा मार्गावरून वाहत असते त्यामुळे यवत ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन संपूर्ण महाराष्ट्रात यवत सारखा ड्रेनेज लाईन कुठेही पाहायला मिळत नाही. लाखो रुपये खर्च करून ही ड्रेनेज लाईन नेमकी कशासाठी केली आहे. असा प्रश्न नागरिकांना पडल्या शिवाय राहत नाही. राष्ट्रीय नॅशनल महामार्ग प्राधिकरण प्रशासनाच्या माध्यमातून. कासुर्डी टोल नाका ते भिगवन गाव हद्दीपर्यंत दुरुस्ती कामासाठी ठेकेदार टेंडर काढले जाते मात्र या कामा बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून पाहणी केली जाते का ? हा खरा प्रश्न निर्माण झाला असुन सेवा मार्ग लगतच्या ड्रेनेज लाईनची साफसफाई होतेय का ? याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सदस्य गाव कारभारी या बाबत राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभाग वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे संबंधित ठेकेदार यांच्या विरुद्ध पत्रव्यवहार करण्याची स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.