By : Polticalface Team ,27-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २६ सप्टेंबर २०२४. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दौंड तालुक्यातील गोरगरीब नागरीकांना हक्काचे घर मिळाले
यातील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा व लाभार्थी मेळावा दि २६ सप्टेंबर रोजी पिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या दौंड तालुक्यातील ५१ महसुली गावातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) चा लाभ मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला, प्रकल्प अहवाल मंजुरी योजनेच्या अंमल बजावणीतील विविध त्रुटी, अडचणी दूर करुन. लाभार्थीना अनुदान मिळावे यासाठी. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या, आज सुमारे ६०० हुन अधिक नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार झाले असल्याने आनंद होत आहे. आज तागायत दौंड तालुक्यातील एकूण २५४६ लाभार्थ्यांची घरकुल प्रकरणे मंजूर झाली असून त्यातील पात्र लाभार्थाना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबर २०२४ पर्यंत उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना योजेनचा लाभ मिळवून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाने नुकतीच प्रधानमंत्री आवास योजना २ ला मंजुरी दिली आहे. या पुढील काळात अनुदानाची रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे तेव्हा नवीन प्रकल्प अहवाल तातडीने मंजूर व्हावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राहुल कुल यांनी बोलताना सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) तील अडथळे दूर करून गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार श्री. एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस मा.नामदार श्री. अजितदादा पवार. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त श्री. योगेश म्हसे यांचे आमदार राहुल कुल यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ.कांचन कुल, भीमा पाटसचे उपाध्यक्ष श्री. नामदेव नाना बारवकर, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे, बाजार समितीचे सभापती श्री. गणेश जगदाळे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. उषाताई चव्हाण, जेष्ठ नेते श्री. माऊली आण्णा ताकवणे, श्री. गोरख आण्णा दिवेकर, भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. बापू भागवत,किसान मोर्चा अध्यक्ष श्री. अरुण आटोळे पिंपळगावच्या सरपंच सौ. सुप्रियाताई नातु यांच्यासह लाभार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :