१ लाख ५० हजार रुपयाच्या बनावट नोटा पाटस परीसरात खपवण्याचा डाव. रंगे हाथ दोन आरोपी यवत पोलीसांच्या जाळ्यात.

By : Polticalface Team ,03-10-2024

१ लाख ५० हजार रुपयाच्या बनावट नोटा पाटस परीसरात खपवण्याचा डाव. रंगे हाथ दोन आरोपी यवत पोलीसांच्या जाळ्यात. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०३ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील बाजार पेठेतील हायवे पुलाजवळ बनावट नोटा बाजारात पसरवण्याचा डाव फसला. पोलीस प्रशासनाची सावध भुमिका आरोपी रंगेहाथ पोलीसांच्या जाळ्यात. पाटस येथील घटना. या बाबत अधिक माहिती अशी की बनावटी नोटा बाळगणाऱ्या दोन आरोपीस यवत पोलीसांनी ताब्यात घेतले. दि.०१/१०/२०२४ रोजी यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोसई किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की दोन अज्ञात लोक बनावट नोटा बाजारात वापरणेसाठी मौजे पाटस ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीत पुणे सोलापुर हायवे रोडचे ब्रिजखाली मोटार सायकल वरून येणार आहेत. अशी बातमी मिळाल्याने पोसई किशोर वागज यांनी यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, यांना माहीती दिली. या बाबत यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन सदर परीसरात ठिक ठिकाणी दबा धरून सहा. फौजदार महेंद्र फणसे, सहा. फौजदार भानुदास बंडगर, पोहवा हिरामण खोमणे, पोकों दत्तात्रय टकले, पो कॉ गणेश मुटेकर, दोन पंच व महाराष्ट्र बँकेचे प्रतिनिधी यांचे सह सापळा रचुन इसम नामे १) अमितकुमार रामभाऊ यादव, वय ३१ वर्षे, मुळ रा. भमारपुरा ता. जालेय जि. दरभंगा राज्य बिहार. हल्ली रा. शालीनी कॉलेज, कोंढवा पुणे २) राकेश चंद्रशेखर यादव रा. दरभंगा बिहार या आरोपींना पाटस पोलीसांनी ब्रिजखाली मोटार सायकल सह ताब्यात घेवुन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात ५००/- रू. दराच्या ०४ एन एम सीरीझ असलेल्या बनावट नोटांचे ३ बंडल मध्ये प्रत्येकी १०० नोटा प्रमाणे एकुण ३०० नोटा असे १. लाख ५० हजार रूपयाच्या बनावट नोटा मिळुन आलेने यवत पोलीसांनी त्यास अटक केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत असल्याचे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले. सदरची कार्यवाही ही मा. पंकज देशमुख साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रा, मा. गणेश बिरादार साो अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. बापुराव दडस साो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग, मा. नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन, पोसई किशोर वागज, पोसई सलीम शेख, सहा. फौजदार महेंद्र फणसे, सहा. फौजदार भानुदास बंडगर, पोहवा अक्षय यादव, पोहवा विकास कापरे, पोहवा हिरामण खोमणे, पोकों दत्तात्रय टकले, पोकॉ गणेश मुटेकर यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष