By : Polticalface Team ,03-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०२ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि ०२ ऑक्टोबर रोजी बैल पोळा सणाच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीतील सर्व सामान्य शेतकरी बांधवांनी खिल्लारी बैलांना रंगीबेरंगी सजावट करुन ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी खिल्लारी बैलांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली होती ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परंपरा कायम राखली आहे. श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्य तसेच यवत ग्रामस्थांनी मानाच्या बैलाची मिरवणूक श्री काळभैरवनाथ मंदिरातून काढण्यात आली. या वेळी पारंपारिक ढोल ताशा संबळ हलगी वाद्यांच्या गजरात मानाच्या बैलाची मिरवणूक गावातून काढण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ गणपती मारुती मंदिर महालक्ष्मी माता मंदिरात यवत पंचक्रोशीतील शेतकरी युवा तरुणांनी खिल्लारी बैल जोडी घेऊन मोठ्या उत्साहाने पारंपरिक ढोल ताशा संबळ हलगी वाद्यांच्या व डिजेच्या धुम धडाक्यात खिल्लारी बैल जोडी देव दर्शनासाठी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. हा बैल पोळा उत्सव पाहण्यासाठी गावातील लहान मोठे जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती मलभारे वस्ती. वाघदर वस्ती. दोरगे वाडी. रावबाची वस्ती. खैरे वस्ती. चोभेमळा. रायकर मळा. शिनगर मळा. खुटवड वस्ती. शेळके मळा. यवत स्टेशन. यादव वाडी. आदी यवत परीसरातील सर्व शेतकऱ्यांनी बैलजोडीसह या बैलपोळा उत्सवात सहभाग घेतला होता. यवत मलभारे वस्ती येथील शेतकरी तात्याराम दत्तात्रय मलभारे यांनी बैल पोळ्याच्या निमित्ताने ३ लाख ११ हजार रुपय किमतीची सुंदर व देखणी खिल्लारी बैल जोडी आणली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज ही पाटलांच्या घरी मळ्यात खिल्लारी बैल जोडी संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात दिसून येते. हैसेला मोल नाही ही परंपरा व वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तात्याराम दत्तात्रय मलभारे. बबनराव तात्या दोरगे. छबनराव कुदळे. या शेतकऱ्यांच्या घरी मळ्यात कायम खिल्लारी बैल जोडी पाहवयास मिळते. गेली नऊ वर्षा पासून संत योगिराज चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याच्या रथाला बबनराव तात्या दोरगे यांच्या बैल जोडीला मानाचे स्थान आहे तर नगारखाना बैल गाडीला यवत येथील शेतकरी छबनराव कुदळे यांच्या बैल जोडीला मानाचे स्थान आहे. डिजे फटाक्यांच्या धुम धडाक्यात विविध भागातील खिल्लारी बैल जोडी एकत्रित घेऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर लावणी नृत्यांगनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युवा तरुणांनी लावणी नृत्यांगनांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या प्रसंगी डिजेच्या कर्कश्श आवाजामुळे जेष्ठ नागरिक हैराण होऊन आयोजकांच्या नियोजना बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विजेच्या कर्कश्श आवाजाने वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले असल्याने डिजे वाजत असलेल्या ठिकाणा पासून दूर जाणे पसंत केले. तसेच डिजे वाजवणे बाबत राज्यात बंदी असताना देखील यवत पोलीस प्रशासनाने डिजे परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. असुन पोलीस प्रशासनाच्या कायदा व सुव्यवस्थे बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी बैल पोळा सणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे. शंकराव दोरगे. कैलास आबा दोरगे. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष यादव. माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे. सदस्य गौरव दोरगे. अशोकराव गायकवाड. संजय दोरगे पाटील. सुनील दोरगे. आण्णा मलभारे. सुरज चोरगे. संतोष मलभारे. सुभाष दोरगे. आदी यवत पंचक्रोशीतील युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :