By : Polticalface Team ,09-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०९ ऑक्टोबर २०२४ दौंड विधानसभा २०२४ निवडणुकीच्या रणधुमाळीत इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक वाढत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या दौंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक असलेल्या पाच इच्छुक उमेदवारांनी आपली भूमिका पक्ष प्रमुखांकडे स्पष्ट केली असून सर्वांनी एकत्रित प्रचार करा अंतिम निर्णय पवार साहेबांचा राहिल असे आश्वासन देण्यात आले असल्याचे माध्यमातून जाहीर करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर दौंड तालुका ग्रामीण व शहरी भागातील ठिक ठिकाणच्या मतदारांना भेटून इच्छुक उमेदवारांनी नुकत्याच गाव भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये दौंड तालुका पश्चिम भागातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील अनेक एक इच्छुक उमेदवार अँड प्रकाश सोळंकी हे नागरिकांच्या चर्चेत असुन दौंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बाबत जन आधार न्यूज २४ दौंड प्रतिनिधी यांनी इच्छुक उमेदवार अँड प्रकाश सोळंकी यांची भेट घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुलासा केला आहे. या वेळी अँड प्रकाश सोळंकी बोलताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मला दौंड विधानसभा. पुणे विधानसभा. शिरूर विधानसभा. या पैकी कोणत्याही मतदार संघात उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्यास तयारी दर्शवली असुन इच्छुक असल्याचे अँड प्रकाश सोळंकी त्यांनी बोलताना सांगितले.
दौंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार. डॉ खळदकर. डॉ वंदना मोहिते. दिग्विजय सिंह जेधे. नामदेव ताकवणे. आणि अँड प्रकाश सोळंकी हे सहावे इच्छुक उमेदवार असल्याची तालुक्यात चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नेमकी कोणाला उमेदवारी निश्चित होतेय हे काही दिवसात स्पष्ट झाल्या शिवाय राहणार नाही. दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षाचे खंदे समर्थक आहेत मात्र इंदापूर प्रमाणे दौंड तालुक्यातील परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा अंतिम निर्णय हा दौंड तालुक्याच्या विकासात्मक परिवर्तनाचा कायापालट करणारा ठरणार आहे त्यामुळे नेमकी तुतारी कोण वाजवणार याकडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :