By : Polticalface Team ,09-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०९ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खुटबाव ता दौंड जिल्हा पुणे येथील विद्यमान सरपंच गीता ताई गणेश शितोळे हे गावातील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या. साधारण दीड लाख रुपये निधी असलेल्या गाव विकास कामाचे उद्घाटन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. उद्घाटन कार्यक्रम आटपून झाल्या नंतर. बऱ्याच वेळाने. गळ्यातील सोन्याचा गंठण हरवला असल्याचे विद्यमान सरपंच शितोळे यांच्या लक्षात आले.
तेव्हा त्यांनी त्यांच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना सांगितले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गाव धुंडाळून काढले मात्र सोन्याचा गंठण मिळाला नाही. गळ्यातील सोन्याचा गंठण हरवला असल्याची चर्चा क्षणात गांवभर पसरली. हा सोन्याचा दागिना गणेश प्रकाश थोरात यांना सापडला होता. त्यांनी आपल्या मनाचा मोठे पणा दाखवून इमानदारीने गावातील नागरिकांच्या समोर विद्यमान सरपंच गीता ताई शितोळे यांना सोन्याचा गंठण दिला. या प्रसंगी खुटबाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निखिल थोरात. उद्योजक चेतन थोरात. दत्तात्रेय थोरात. नरेंद्र महाराज भागवत. संतोष आप्पा थोरात. माजी सैनिक दत्तात्रय शेलार. महेश शेलार. तसेच खुटबाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राऊत उपस्थित होते. या वेळी विद्यमान सरपंच गीता ताई शितोळे यांनी गणेश प्रकाश थोरात यांचे आभार व्यक्त करत. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी देखील भरभरून कौतुक केले गावाकडील माणसं इमानदार असल्याचे स्पष्ट झाले. हा सर्व प्रकार गावातील गाव कारभाऱ्यांच्या चर्चेतून खुलासा झाला असल्याने समोर आले.
वाचक क्रमांक :