श्री काळभैरवनाथांची पालखी सोहळा. हजरत बडेशावली दर्गा येथे. दसरा महोत्सव यवत ग्रामस्थांनी अंधारात सोनं (आपटा) लुटुन घेतल्या गळाभेटी.

By : Polticalface Team ,13-10-2024

श्री काळभैरवनाथांची पालखी सोहळा. हजरत बडेशावली दर्गा येथे. दसरा महोत्सव यवत ग्रामस्थांनी अंधारात सोनं (आपटा) लुटुन घेतल्या गळाभेटी. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १३ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील विजयादशमी दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची पालखी सोहळा घेऊन मानकरी सह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व समिती सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने दसरा महोत्सवात सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात विजयादशमी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने श्री काळभैरव नाथांची पालखी (विसावा स्थान) पूर्व काळापासून हजरत बडे शहावली दर्गा या ठिकाणी जागा आहे. यवत नगरीतील गावकरी या ठिकाणी श्री काळभैरव नाथांची पालखी घेऊन जातात. श्री काळभैरवनाथ व हजरत बडे शहावली बाबा या सुफी संत अवलियांची भेट होते. अशी गावकऱ्यांमध्ये धार्मिक भावना आहे. हि परंपरा पूर्व काळापासून आज पर्यंत गावकऱ्यांनी जपली आहे. या ठिकाणी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने सोनं (आपटा) लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात अशी परंपरा कुठेही दिसून येत नाही. हिंदू मुस्लिम दोन समाजातील नागरिकांचा एकोपा टिकून राहावा या उद्देशाने. हा धार्मिक कार्यक्रम व परंपरा असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी दसरा उत्सव वर्षातून एकदा पाहवयास मिळतो मात्र या वे मुस्लिम समाजातील नागरिकांनी या उत्सवाकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले. श्री काळभैरवनाथाची पालखी विसावा स्थानी ठेवून आरती केली जाते. व नंतर सोनं आपटा लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम केला जातो मात्र या प्रसंगी लाईट बंद असल्याने अंधारात श्री काळभैरवनाथांची आरती करण्यात आली. तसेच सोनं आपटा लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम देखील अंधारात पार पडला या प्रसंगी दिलीप शेठ यादव तसेच अनेक ग्रामस्थांनी लाईट लावण्या बाबत सांगितले तरी देखील लाईट लावण्यात आली नाही. हि बाब अतिशय दुरदैवी असल्याचे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले. असुन सदर प्रकारा बाबत नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी मुस्लिम समाजातील मदरसा संस्थेतील विद्यार्थी मुलं निवासी राहत आहेत. मात्र गावातील मुस्लिम समाजातील एकही व्यक्ती हजरत बडे शहावली बाबा दर्गा येथे दिसुन आली नाही. हजरत बडेशावली बाबा दर्गा मुजावर फैय्याज भाई तांबोळी बोलताना म्हणाले मी लाईन चालु करुन ठेवली होती असे त्यांनी सांगितले. दसरा महोत्सव वर्षातून एकदा साजरा केला जातो या पुढे. श्री काळभैरवनाथांच्या पालखी विसावा स्थानी. हजरत बडे शहावली बाबा दर्गा या ठिकाणी गावकरी व्यवस्था करतील अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने नागरिकांनमध्ये शांतता पसरली व धार्मिक कार्यक्रम आटपून घेतला. श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष सतीश दोरगे. संपत दोरगे. अशोकराव गायकवाड. मयुर गायकवाड. चंद्रकांत दादा दोरगे. नानासाहेब दोरगे महाराज. कैलास आबा दोरगे. रघुनाथ दादा दोरगे. यवत ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे. यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दसरा उत्सवाच्या निमित्ताने यवत येथील प्रमुख मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समिती सदस्य तसेच माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक नाना खुटवड यवत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे रमेश शेठ यादव हभप नानासाहेब दोरगे महाराज. माऊली आबा शेळके. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष यादव. सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके. आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते श्री काळभैरवनाथ पालखी मिरवणूक महालक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी पोचली धार्मिक कार्यक्रम देवीची आरती करून रावण दहन करण्यात आले या प्रसंगी या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच यवत ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. श्री काळभैरवनाथांची पालखी सोहळ्याचे पुढे पायघड्या घालून गाव गोंधळी यांच्या पारंपारिक वाद्याच्या आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात म्हसोबा चौक येथे मानकरी व चंद्रकांत दादा दोरगे यांच्या घरी पालखी सोहळा विठ्ठल समाज भजनी मंडळातील वारकरी सांप्रदायातील नागरिकांनी भजन गाऊन दसरा महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.