By : Polticalface Team ,13-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
पुणे ता १३ ऑक्टोबर २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.अजित दादा पवार गटाच्या वतीने मंगळवार पेठ श्रमिक नगर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये मंगळवार पेठ येथील नागरिकांनी व अनेक लाडक्या बहिणींनी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या शिबिरामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी, कान, नाक, घसा, तपासणी रक्त तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उपस्थित रुग्णांना मोफत औषधे वाटत करण्यात आली. या महाआरोग्य शिबीरामध्ये सुमारे 500 हुन अधिक नागरिकांनी विविध आजारांवर तपासणी उपचार करून लाभ घेतला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून लाडकी बहिण योजना घरा घरातल्या बहिण पर्यंत पोचली आहे. मात्र त्यांच्या आरोग्या बाबत देखील विचार केला जात आहे हि बाब अतिशय महत्त्वपूर्ण असुन या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे पुणे शहर सरचिटणीस मा. महेंद्र दुलीचंद लालबिगे व त्यांच्या पत्नी सौ नीलम महेंद्र लालबिगे यांनी परिश्रम घेऊन केले होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे. महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शंतनू कुकडे, वर्षा साळुंके, डॉ नरसिंग चिप्पा, महेंद्र भोसले, हेमंत लालबिगे, मंगेश साळुंखे, जावेद शेख, रोहित चंडालिया, धीरज साळुंके, राकेश जाधव, आदि सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :