यवत सह दौंड उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी घरफोडी सारखे २० गुन्हे. करणारी टोळी जेरबंद १० तोळे सोन्याचे दागिने सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

By : Polticalface Team ,14-10-2024

यवत सह दौंड उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी घरफोडी सारखे २० गुन्हे. करणारी टोळी जेरबंद  १० तोळे सोन्याचे दागिने सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १४ ऑक्टोबर २०२४ यवत सह दौंड उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे २० गुन्हे करणारी टोळी. यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी जेरबंद केली असून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने,व मोटारसायकल सह सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की दि.०४ ऑक्टोंबर रोजी रात्री ०९.३० च्या सुमारास कानगाव हद्दीतील रेल्वे पुलाजवळ काही जण दुचाकीसह हत्यार बंद दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे. यवत पोलीस पथक सदर ठिकाणी गेले असता चोरट्यांनी दोन्ही मोटार सायकलला आग लावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. असता या पैकी आरोपी १) सिध्दू रसिकलाल चव्हाण याला लोखंडी कोयत्या सह ताब्यात घेऊन चौकशी केली असता. २)दिपक रसिकलाल चव्हाण (रा.इनामगाव ता. शिरूर) ३)बाबुशा गुलाब काळे (वय २१ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), ४) प्रशांत फोटया उर्फ बंडू काळे (रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर) ५) हनुमंत फोटया उर्फ बंडू काळे ( रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर ) हे साथीदार असल्याचे सांगितले. या वेळी पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला असता या पैकी बाबुशा गुलाब काळे याला दौंड पोलीस स्टेशन हद्दीत ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्व जण कानगाव येथे दरोडा टाकण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. १)सिध्दू रसिकलाल चव्हाण ( वय १९ रा. इनामगाव तालुका शिरूर) व ३) बाबुशा गुलाब काळे (वय २१ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता यवत, दौंड व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोड्या, दरोडा, जबरी चोऱ्या असे एकुण २० गुन्हे उघडकीस आले असून कबुली दिली आहे. यामध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीतील १७ गुन्हे. दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील २ गुन्हे व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील १ गुन्ह्यांचा समावेश असून सदर आरोपींन कडून गुन्हातील चोरी केलेले सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकल सह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली सहा.पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे, हिरालाल खोमणे. गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, रामदास जगताप, विकास कापरे, पोलीस कॉन्स्टेबल मारूती बाराते, गणेश मुटेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, विजय कांचन, राजु मोमीण, पोलीस हवालदार शेख यांच्या पथकाने केली असून सदर ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष