दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.
By : Polticalface Team ,16-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १६ ऑक्टोबर २०२४ दौंड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 या अनुषंगाने दि.15/10/2024 पासून ते दि. 25/11/2024 रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्या असून पुणे जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान दि. 20/11/2024 रोजी होणार आहे. व निकाल दिनांक 23/11/2024 रोजी जाहीर होणार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की आदर्श आचारसंहिता काळामध्ये कोणीही नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जाती, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा प्रकारे व स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकारे वरील माध्यमाद्वारे प्रसिद्ध करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली असुन फटाके फोडणे गुलाल उधळणे महागात पडू शकते. आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे तसेच संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत.
मोबाईल व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 15/10/2024 ते दिनांक 25/11/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा. जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही या बाबत दक्षता घ्यावी. जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
गोपाळ पवार यांनी दिली आहे. या प्रसंगी दौंड पोलिस स्टेशन पांडुरंग थोरात सहा.पोलिस उपनिरीक्षक ( गोपनीय विभाग )
उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.