कडेठाण येथील सांजोबा देवाची यात्रा होणार उत्साहत साजरी. लावणी नृत्याचा धुमाकूळ. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा.

By : Polticalface Team ,19-10-2024

कडेठाण येथील सांजोबा देवाची यात्रा होणार उत्साहत साजरी. लावणी नृत्याचा धुमाकूळ. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा.   दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड. ता १९ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण ता दौंड जिल्हा पुणे येथील गावचे ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा उत्सव रविवार दि २० ऑक्टोबर व सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी जोरदार साजरी करण्यात येणार आहे. रविवारी पहाटे ५.३०वा. देवाची पूजा होणार असून दुपारी १२.०० वा. मानाची काठी निघणार आहे. तर सायंकाळी ६.०० वा. देवाची पालखी. गावातील समस्त ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट समितीचे मान्यवर एकत्रित मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणूक फटाक्यांच्या धुमधडाक्यात आकर्षित अतिशबाजी करत देवाची पालखी छबीन्याची मिरवणूक काढली जाते. तसेच कडेठाण गावचे ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लोक मनोरंजनाचा जंगी कार्यक्रम सायंकाळी (बारा गावच्या बारा अप्सरा) या लावणी नृत्याचा धुमाकूळ कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थान कमिटीच्या आयोजकांनी सांगितले. सोमवारी सकाळी ६.०० वा. पालखी वाजत गाजत गावातील हानुमान मंदिरामध्ये ग्रामस्थ घेऊन येतात या वेळी सकाळच्या हाजऱ्या मनोरंजनाचा कार्यक्रम ९.०० वा रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळाचा जोरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी ३.०० वा. संजोबा देवाची पालखी छबीना पारंपरिक वाद्याच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक होणार आहे. तसेच रात्री ८.०० वा. लोक मनोरंजनासाठी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रा महोत्सव बाबत देवस्थान ट्रस्ट समितीचे पदाधिकारी. गावकऱ्यांनी व गाव पोलीस पाटील यांनी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची भेट घेऊन सदर कार्यक्रमाची माहिती दिली असुन. पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून. आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा उत्सव हा धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी. अन्यथा कोणाचीही गई केली जाणार नाही. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी बोलताना सांगितले. सदर यात्रा उत्सव हा जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली व युवा तरुणांच्या सहकार्याने खेळी मेळीच्या वातावरणात सदर यात्रा उत्सव पार पडला जातो. अशी प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष