दापोडी ग्रामपंचायतीकडे हंगामी कामगार आहेत. ग्रामपंचायतीची स्थिती कमकुवत असल्याने त्यांना पगार आदा करणे शक्य होत नाही. ठराव सर्वानुमते मंजूर

By : Polticalface Team ,22-10-2024

दापोडी ग्रामपंचायतीकडे हंगामी कामगार आहेत. ग्रामपंचायतीची स्थिती कमकुवत असल्याने त्यांना पगार आदा करणे शक्य होत नाही. ठराव सर्वानुमते मंजूर दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २१ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे दापोडी ता. दौंड जिल्हा पुणे. येथील दापोडी ग्रामपंचायत कार्यालय समोर महिला सफाई कामगार. दामिनी सोमनाथ सकट व यांचे पती श्री सोमनाथ बन्सी सकट यांचे कुटुंबासह दि. १८/१०/२०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या बाबत अधिक माहिती अशी की दामिनी सोमनाथ सकट ह्या महिला गेली सहा ते सात वर्षांपासून दापोडी ग्रामपंचायती मध्ये (हंगामी) सफाई कामगार म्हणून आहेत त्यांना ग्रामपंचायतीकडून मासिक २ हजार ७७५ रुपये इतके वेतन असुन मागिल १८ महिन्याचा वेतन पगार मिळाला नाही. त्यांचा एकुण ४९ हजार ९५० रुपये इतका पगार दापोडी ग्रामपंचायतीकडे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. दामिनी सोमनाथ सकट या महिला सफाई कामगाराचा वेळेवर पगार न झाल्याने त्यांच्या कुटुंबावर वेळोवेळी उपासमारीची वेळ आली. दसरा दिवाळी सनाच्या निमित्ताने बाकी पगार मिळावा अशी मागणी केल्याचा राग धरून दापोडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आबासाहेब गुळमे व ग्रामसेवक मिसाळ यांनी सफाई कामगार महिलेचा वेतन पगार देण्या ऐवजी उलट सफाई कामगार दामिनी सोमनाथ सकट यांना कामावरून कमी करण्या बाबत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामध्ये ग्रामपंचायत दापोडी येथे दामिनी सोमनाथ सकट ह्या ग्रामपंचायतीकडे हंगामी कामगार आहेत. ग्रामपंचायतीची स्थिती कमकुवत असल्याने त्यांना पगार आदा करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात यावे. असे सर्वानुमते ठरले. तसेच त्यांचा मागिल हिशोब करुन पगार आदा करण्यात यावा. असा ठराव सुचक विजय हनुमंत भंडलकर. अनुमोदक सोनाली मोहन रुपनवर यांची नावे असुन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. बाकी पगार देण्या ऐवजी ठरावाची नक्कल प्रत महिला सफाई कामगार यांना देण्यात आली असल्याने सदर कामगार महिलेचे पती श्री सोमनाथ सकट हे कुटुंबासह दापोडी ग्रामपंचायत कार्यालय समोर चार दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. दापोडी ग्रामपंचायत गावची लोकसंख्या पाहता अंदाजे ५ ते ६ हजार इतकी असुन १३ सदस्य असलेली हि दापोडी ग्रामपंचायत एका सफाई कामगारांच्या वेतनामुळे आथिर्क स्थिती कमकुवत झाली आहे. हा आश्चर्यजनक प्रकार सर्वान समोर आला असल्याने गावात एकाच खळबळ उडाली आहे. पाणी पुरवठा विभाग. सार्वजनिक विज बिल तसेच इतर मासिक व दररोजच्या खर्चा बाबत दापोडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आबासाहेब गुळमे व ग्रामसेवक मिसाळ यांनी ग्रामपंचायतीच्या खर्चा बाबत अधिक काटकसर करण्याची आवश्यकता असल्याची गावातील नागरीकांमध्ये चर्चा होत आहे. सदर बेमुदत धरणे आंदोलन संदर्भात यवत पोलीस स्टेशन. दौंड पंचायत समिती. दौंड तहसील कार्यालय व पुणे जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी दि १४/१०/२०२४ रोजी आंदोलन कर्त्यांनकडून बेमुदत धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दापोडी ग्रामपंचायतीचे सरपंच आबासाहेब गुळमे यांना संपर्क साधला असता दौंड पंचायत समिती या ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले. दापोडी ग्रामपंचायत समोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन संदर्भात विचारले असता ते बोलताना म्हणाले दापोडी ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी कर वसुली झाली नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून सर्व कामगारांचा पगार थकीत आहे. उपोषण करते सफाई कामगार यांच्याकडे देखील घरपट्टी कर बाकी थकीत आहे. दापोडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मिसाळ यांच्याकडे दोन गावांचा कार्यभार असल्याने व ते इतर ठिकाणी राहत असल्याने नेहमी ग्रामपंचायत कार्यामध्ये दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे कर वसुली व इतर कामांचा नेहमीच खोळबा होत आहे. दापोडी ग्रामपंचायतीला कार्यक्षम असलेले ग्रामसेवक मिळावा या बाबत सतत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. दापोडी ग्रामपंचायत कर वसुली न झाल्याने अडचणीत आहे. अनेक दिवसापासून सर्व सफाई कामगारांचा पगार थकीत आहे. दापोडी ग्रामपंचायतीच्या वतीने कर थकबाकीदार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केल्या आहेत. मात्र कर वसुली होण्याचे दिसून येत नाही. दौंड गट विकास अधिकारी यांना संपर्क साधा असे दापोडी ग्रामपंचायतीचे सरपंच आबासाहेब गुळमे यांनी बोलताना सांगितले. दापोडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मिसाळ यांच्याशी संपर्क साधुन सदर सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलना बाबत बोलताच ग्रामसेवक मिसाळ यांनी निवडणूक प्रक्रियेच्या कामात असल्याचे तात्काळ सांगुन सदर विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली. दौंड पंचायत समिती गटविकास अधिकारी मा प्रशांत काळे यांना संपर्क साधला असता. ते म्हणाले दापोडी ग्रामपंचायतीचे सरपंच आबासाहेब गुळमे आले आहेत ग्रामपंचायत सफाई कामगार संदर्भात व धरणे आंदोलन विषयावर चर्चा सुरू असल्याचे गटविकास अधिकारी मा प्रशांत काळे त्यांनी बोलताना सांगितले. दापोडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक मिसाळ यांच्या निष्काळजी कामा बाबत गावात व तालुक्यात चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे. अनेक दिवसापासून कर वसुली थकीत असताना देखील सरपंच व ग्रामसेवक यांनी वसुली बाबत ठोस निर्णय घेतले नसल्याने ग्रामपंचायत सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वसुली होत नाही म्हणून कामगारांना घरी बसण्याचा निर्णय सरपंच घेतात ही मोठी लाजिरवाणी व शर्मनाक बाब असल्याची गावभर चर्चा होत आहे. दसरा दिवाळीच्या निमित्ताने सर्व ठिकाणी सफाई कामगारांना डबल पगार बोनस देऊन खुष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र दापोडी ग्रामपंचायतीमध्ये अनेक दिवसा पासून कामगारांचा पगारच थकीत आहे. तर दसरा दिवाळी कशी करणार असा प्रश्न सफाई कामगारांपुढे निर्माण झाला आहे. या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण ? दौंड पंचायत समिती गटविकास अधिकारी. ग्रामसेवक मिसाळ. विद्यमान सरपंच आबासाहेब गुळमे की गावातील थकबाकीदार ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. दापोडी ग्रामपंचायती मध्ये एकच महिला सफाई कामगार असुन देखील वेळेवर पगार मिळत नाही. हि मोठी आश्चर्यजनक बाब आहे. महिला सफाई कामगार दामिनी सोमनाथ सकट यांचा थकीत बाकी पगार तत्काळ मिळावा अशी मागणी सोमनाथ सकट यांनी केली आहे. दि १०/१२/२०२३ रोजी ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी सन २०२२ ते २०२३ या कालावधीचा ४ हजार ९३४ रुपये घरपट्टी पाणीपट्टी कर रक्कम भरल्याची पावती. तसेच ०१/१०/२०२३ रोजी १ हजार ७४७ रुपये इंदुबाई वामन सकट यांचे नावे कर रक्कम भरल्याची पावती दाखवली असुन दापोडी ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही. तर हे बेमुदत आंदोलन उग्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा श्री सोमनाथ सकट यांनी दिला आहे. या बेमुदत आंदोलनाला लहुजी क्रांती सेना. सत्यशोधक आघाडी. तसेच राष्ट्रीय फुले ब्रिगेड व जय मल्हार क्रांती संघटना आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.