दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता 28 ऑक्टोबर 2024. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम दि.08/10/2024 ते 27/10/2024 या कालावधीत. निवडणूक निर्णय अधिकारी मा शिवाजीराव कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ऑक्टोबर रोजी अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनि. कॉलेज (पी.ए. इनामदार विद्यापीठ,आझम कॅम्पस), पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान झाले. या निवडणुकीत एकूण 64% मतदान होऊन जी.के. थोरात यांच्या पॅनलचा प्रचंड बहुमताने विजय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी 11 ते दुपारी 2 वा जे पर्यंत प्रत्यक्ष संपुर्ण मतदान झाले. या वेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव कामथे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सागर पाटील (कोकण), आर. आर. पाटील ( जळगाव) इनामदार सर (मुंबई) उपस्थित होते. मतदान मोजणी अधिकारी प्रा.अरविंद मोडक, सचिन दुर्गाडे, संतोष थोरात यांनी मतमोजणी करून मुख्य निवडणूक अधिकारी शिवाजीराव कामथे यांनी अंतिम निवडणुकीचा निकाल जाहीर करुन यामध्ये विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. नवनिर्वाचित पंचवार्षिक कार्यकारणी पुढील प्रमाणे1) जी.के. थोरात अध्यक्ष पुणे. 2) नरसु पाटील कार्याध्यक्ष कोकण. 3) नानासाहेब फुंदे उपाध्यक्ष मुंबई.4) आर. एच.बाविस्कर उपाध्यक्ष जळगाव. 5) के एस.ढोमसे कार्यवाह पुणे. 6) निशांत रंधे खजिनदार धुळे.7) रोहित जाधव सहसचिव कोकण. 8) सौ.ज्योती नेटवटे सहखजिनदार मुंबई. 9) मुकुंद साळुंके सदस्य सोलापूर.10) एन.डी. नांद्रे सदस्य धुळे. 11) रमेश म्हात्रे सदस्य कोकण... स्वीकृत सदस्य 1) अर्चना जमाले सोलापूर.2) मनोज शिरसाट नाशिक. 3) अजय शिंदे कोकण.4) मंगला चव्हाण मुंबई. )या मतदान प्रक्रिये बाबत मतदान अधिकारी म्हणून संतराम इंदुरे, अशोक देवकते आणि अशोक धालगडे यांनी काम पाहिले. तसेच या निवडणुकीसाठी प्रा. शशिकांत शिंदे व पंकज घोलप यांनी. विशेष तांत्रिक सहाय्य केले.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांची एकत्रित सभा होऊन सर्वानुमते जी. के. थोरात यांची अध्यक्षपदी, नरसु पाटील यांची कार्याध्यक्ष पदी. तसेच के. एस. डोमसे यांची सचिव पदी बहुमताने निवड झाली. व इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पॅनलच्या वतीने सर्व मतदारांचे आभार व्यक्त करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष जी.के. थोरात यांनी मनोगत व्यक्त केले बोलताना ते म्हणाले येणाऱ्या काळामध्ये संघटना बळकट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील व भर दिला जाणारा असून सर्व प्रकारच्या शिक्षकांचे व शाळांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. टीडीएफचा महाराष्ट्रात प्रचार व प्रसार करणार असल्याचे आश्वासन थोरात यांनी दिले. या प्रसंगी नरसु पाटील के. एस ढोमसे नानासाहेब फुंदे यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. हि निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवल्या बद्दल निवडणूक निर्णय अधिकारी मा शिवाजीराव कामथे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.तसेच या निवडणुकीसाठी शाळा उपलब्ध करून दिल्या बद्दल संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करुन. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते. प्राचार्य राज मुजावर यांना शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी पुणे, मुंबई, नाशिक विभागातील व राज्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.