दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्या बद्दल सर्व मित्र पक्षांचे माणले आभार - अँड राहुल कुल.

By : Polticalface Team ,05-11-2024

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्या बद्दल सर्व मित्र पक्षांचे माणले आभार - अँड राहुल कुल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०४ नोव्हेंबर २०२४. दौंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने. वीरधवल (बाबा) जगदाळे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने. दौंडमध्ये महायुती आता भक्कम स्थितीत असून महायुतीच्या वतीने. मा अजित पवार आणि महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार अँड राहुल कुल यांनी व्यक्त केली. दौंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने. महायुतीतील बंड थोपविण्यात राहुल कुल यांना येश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अधिक भक्कम पणा येणार असून आम्ही या निवडणुकीला ताकतीने सामोरे जाऊ. विजय हा निश्चित आमचा असेल अशी प्रतिक्रिया महायुतीचे अधिकृत उमेदवार अँड राहुल कुल त्यांनी बोलताना सांगितले असून. दौंड तालुक्यातील महायुतीमध्ये असलेल्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वीरधवल जगदाळे यांनी आज ०४ नोव्हेंबर रोजी दौंड तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. या वेळी बोलताना ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते मा अजित दादा पवार. सुनिल तटकरे यांचे मी आभार मानतो. त्यानी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ऐ बी फॉर्म देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे अनेक लोकांनी भेटुन मला शुभेच्छा दिल्या. माघार घेतल्याने कार्यकर्त्यांच्या नाराजी आहे. मी सर्वांची जाहीर माफी मागतो. माझ्या सतसत बुध्दीला जे पटलं ते मी केलं. दौंड तालुक्यात व राज्यांमध्ये महायुतीला अतिशय चांगलं व पोषख वातावरण निर्माण झालं आहे. मला उमेदवारी जी दिली आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा एक घटक आहे. माझ्या उमेदवारी मुळे महायुतीमध्ये कुठलीही बिघाडी होऊ नये अशा प्रकारची माझी भुमिका आहे. म्हणून आज मी माघारी घेतलेली आहे. महायुतीच्या नेत्यांनी माझी उमेदवारी माघारी घ्यावी असे आव्हान केले होते. सेवठी बोलताना ते म्हणाले महायुतीचे आम्ही सर्वजन काम करणार आहे. असे वीरधवल जगदाळे यांनी सांगितले या वेळी वैशाली ताई नागवडे उपस्थित होत्या यांनी बोलताना सांगितले की जगदाळे यांच्या विविक बुध्दीला जे पटलं ते त्यांनी केलं. कारण महायुतीत कुठलीही बिघाडी होऊ नये. त्या पद्धती त्यांच्या मनाला वाटले असेल की आपल्यामुळे नेत्यांनाही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. आम्ही सगळेजन एकत्रित काम करतो जगदाळे बाबांनमुळे मी इथे आली असल्याचे त्यांनी सांगितले. 199 दौंड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधिल राष्ट्रीय व राज्यस्तरा वरील मान्यता प्राप्त राजकीय व अपक्ष उमेदवारांनी आज दि ०४ नोव्हेंबर रोजी माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे. १) जगदाळे वीरधवल कृष्णराव. माळवाडी लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे. (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) २) बादशहा आदम शेख. कुंभार गल्ली दौंड ता.दौड जिल्हा पुणे. (वंचित बहुजन आघाडी) ३) संदीप विक्रम आढाव. गोपाळवाडी ता दौंड जिल्हा पुणे. (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) ४) राजाभाऊ मारुती तांबे. पारगाव ता दौंड जिल्हा पुणे. (अपक्ष) ५) वसंतराव विनायक साळुंखे. पाटस ता दौंड जिल्हा पुणे. (अपक्ष) ५) सुमन राजेंद्र मस्के मु पो पाटस ता दौंड जिल्हा पुणे ( अपक्ष ) या प्रमाणे आहेत. विधानसभा या निवडणुकीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पक्षाच्या वतीने एका तालुक्यात दोन उमेदवारांना ऐ बी फॉर्म दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दौंड मध्ये देखील घडले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. अधिकृत उमेदवार म्हणून जीवन अशोक गाडे यांना १९९ दौंड विधानसभा मतदार संघाची. अधिकृत उमेदवारी देऊन ऐ बी फॉर्म देण्यात आला होता. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या यादीमध्ये. जीवन अशोक गाडे यांचे नाव देखील जाहिर करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा अर्ज बाद झाल्याने जीवन अशोक गाडे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दौंड शहरातील बादशहा आदम शेख. यांना देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. ऐ बी फॉर्म देण्यात आला होता. मात्र त्यांनी आज ०४ नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे. या बाबत बोलताना बादशहा शेख म्हणाले माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबई वरून ऐ बी फॉर्म मागविण्यात आला होता. पण हा ऐ बी फॉर्म कुणी आणला हे मला देखील सागता येणार नाही. बादशहा शेख यांनी बोलताना सांगितले. दौंड विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आजी माजी आमदारांची काटेकी टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. दौंड तालुक्यातील मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे बारामती लोकसभा मतदार संघाचे व संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.