श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
By : Polticalface Team ,17-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १७ नोव्हेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील: श्री काळभैरवनाथ मंदिर, या ठिकाणी आज दि १७ नोव्हेंबर पासून श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा देवस्थान ट्रस्ट समिती तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ, यांचे विद्यमाने आयोजित करण्यात आले असून कार्तिक कृ. २, रविवार दि.१७/११/२०२४ ते कार्तिक कृ. ९ रविवार दि.२४/११/२०२४ पर्यंत श्री काळभैरवनाथाच्या कृपेने श्री नाथ जन्माष्टमी प्रीत्यर्थ संर्कीतन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन असे धार्मिक सांप्रदायिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. समस्त ग्रामस्थांनी या सुवर्ण अपुर्व सर्वांगिन भक्ती सोहळ्याच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीत भाविक भक्तांनी आनंद घ्यावा. असे देवस्थान ट्रस्ट समितीचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले हि धार्मिक परंपरा अनेक वर्षा पासून अखंड सुरू आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. संतांची या संगती मनो मार्गी गती. अकळावा श्रीपती येणे पंथे. त्यामुळे यवत नगरीतील व पंचक्रोशीतील सर्व श्रध्दानिष्ठ भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती करण्यात आली आहे.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने पुढील आयोजित कार्यक्रम आहेत.व्यासपीठ चालक: ह.भ.प. शंकर महाराज उंडे (आळंदी देवाची)
दैनंदिन कार्यक्रम: पहाटे ४ ते ६ काकड आरती, महापूजा अभिषेक सकाळी ७ ते ८, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ८ ते ११, श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन दुपारी १२ ते २, दुपारचे भोजन १२.३० ते २.३०, सांय ४ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व रात्री ११ ते ४ हरिजागर. असुन
दररोज नियमित विशेष कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.
रविवार दि १७/११/२०२४. रोजी प्रवचनकार ह.भ.प.धनवडे महाराज (भांडगांव) किर्तन सोहळा रात्री ९ ते ११ ह भ प उत्तम महाराज बडे (आळंदी). हरिजागर रात्री ११ ते ४ श्री विठ्ठल समाज भजनी मंडळ (यवत.)
सोमवार दि १८/११/२०२४ रोजी प्रवचनकार ह भ प सदाशिव महाराज कामठे (फुरसुंगी) किर्तन सोहळा रात्री ९ ते ११ ह भ प रामेश्वर महाराज इंगळे (आळंदी). हरीजागर रात्री ११ ते ४ भोसलेवाडी भजनी मंडळ.
मंगळवार दि १९ /११/२०२४ रोजी प्रवचनकार ह भ प उत्तम महाराज ढवळे (वडगाव रासाई). कीर्तन सोहळा रात्री ९ ते ११ ह भ प भरत महाराज जोगी (परळी). हरिजागर रात्री ११ ते ४ सौदडवाडी उंडवडी भजनी मंडळ.
बुधवार २०/११/२०२४ रोजी प्रवचनकार ह भ प नानासाहेब चितळे महाराज शितोळे (पाटस). किर्तन सोहळा रात्री ९ ते ११ ह भ प सोपान काका महाराज (टेंभुरकर.) हरीजागर रात्री ११ ते ४ भरतगाव भजनी मंडळ कासुर्डी भजनी मंडळ.
गुरुवार दि २१/११/२०२४ रोजी प्रवचनकार ह भ प सुमंत महाराज हंबीर बापू (पाटेठाण) किर्तन सोहळा रात्री ९ ते ११ ह भ प महादेव महाराज रसाळ (लासुरणे) हरीजागर रात्री ११ ते ४ कामटवाडी भजनी मंडळ कासुर्डी.
शुक्रवार दि २२ /११/२०२४ रोजी प्रवचनकार ह भ प रवी काका अत्रे (खोर) किर्तन सोहळा रात्री ९ ते ११ ह भ प संत दास महाराज मनसुख (जुन्नर) हरिजागर रात्री ११ ते ४ लडकतवाडी व पोंढ भजनी मंडळ.
शनिवार दि २३/११/२०२४ रोजी भव्यदिंडी सोहळा दु ४ ते ६
ह भ प पांडुरंग महाराज गिरी वावी (सिन्नर) श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव कीर्तन रात्री १० ते १२ हरी जागर नाथांचा गोंधळ व भारुड.
रविवार दि २४/११/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन सोहळा. ह भ प गणेश महाराज जाधव (जालना)
श्री काळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात धार्मिक सांप्रदायिक रंगत दर्शविणारे प्रामुख गायनाचार्य ह भ प प्रकाश महाराज घुले (परभणी) ह भ प नानासो शितोळे महाराज (पाटस). ह भ प विष्णुपंत पांढरे. ह भ प विनोद झेंडे महाराज (पाटस) ह भ प उत्तम बुवा ढवळे महाराज (वडगाव रासाई) ह भ प लक्ष्मण महाराज पवार. पेटी मास्तर मृदुंगाचार्य ह भ प विजय धर्माधिकारी माळशिरस ह भ प वैभव महाराज गायकवाड (कासुर्डी).
मृदुंगसाथ. कीर्तन. काकडा. व गायन साथ श्री धनवडे बुवा (भांडगाव) श्री किरण कांबळे महाराज (यवत) श्री वाबळे चोपदार (यवत) ह भ प मच्छिंद्र महाराज शितोळे चोपदार (रोटी),
टिप: काही अपरिहार्य कारणाने कार्यक्रमात बदल करण्चाचा अधिकार समस्त ग्रामस्थ मंडळ, यवत यांचा राहील असे नमूद करण्यात आले आहे. आपले नम्र : श्री.विठठल समाज भजनी मंडळ, श्री समस्त ग्रामस्थ मंडळ यवत. श्री. काळभैरवनाथ देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्ट, यवत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.