संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
By : Polticalface Team ,16-12-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.हवेली तालुक्यातील मौजे उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे दि १५ डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करा अशी मागणी होत असुन. संविधानाची विटंबना करणाऱ्या मणोरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हवेली तालुक्यातील आर पी आय आठवले कार्यकर्त्यांची हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलिस स्टेशन या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असल्याचे हवेली युवक तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलताना सांगितले परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एक माथेफिरूने विटंबना केली आहे. सदर घटनेचा भिम अनुयायी जाहीर निषेद करतो या घटने नंतर परभणी शहरातील व पुणे शहराती आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे संविधानाचा अवमान करणाच्या आरोपींवर व या मागचा प्रमुख सुत्रधारावर देशद्रोहाचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे हवेली तालुका व सर्व भिममनुयायी व सर्व राजकीय पक्ष संघटना यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आहे तरी परभणी येथील पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित आरोपींना अटक करून या मागचा प्रमुख सुत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर घटनेच्या निषेधार्थ भिम सैनिक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही या बाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे अवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.
वाचक क्रमांक :