नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
By : Polticalface Team ,18-12-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १८ डिसेंबर २०२४ हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु असून अधिवेशनात दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध विषयावर आमदार राहुल कुल यांनी विविध मुद्दे मांडले सध्या दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात वाढत असलेला बिबट्याचा प्रादुर्भाव व बिबट व मानव यांच्यातील वाढता संघर्ष लक्षात घेता शासनाने तातडीने उपयोजना कराव्यात व दौंड तालुक्यातील कडेठाण येथील बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या स्व. लता धावडे यांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली.
खडकवासला कालवा ते फुरसुंगी बंदी नळी कालवा सुमारे २२०० कोटींचा प्रकल्प तसेच जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) चे काम तातडीने पूर्ण करावे, मुळशी धरणाचे पाणी पूर्वमुखी वळविण्यात यावे, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना बंद नळीतून करण्यात यावी, पुरंदर उपसा अंतर्गत खुपटेवाडी फाट्याची पुनर्रचना करण्यात यावी, पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने नदी जोड प्रकल्प, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प तातडीने आदी प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून, एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा कालावधी वाहतूक कोंडीमुळे लागत आहे त्यासाठी आवश्यक असलेला पुणे रिंग रोडचे काम गतीने पूर्ण करावे.
ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना राबविणे तसेच कुरकुंभ, ता. दौंड येथील MIDC मध्ये सापडलेल्या MDF ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
राज्याच्या ग्रामीण भागातील नकाशावर समाविष्ट नसलेल्या रस्त्यांना शासनाकडून कोणत्याही निधी तरतुद नाही. ग्रामीण रस्त्याला निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, माझ्या दौंड तालुक्यातील अनेक रस्ते आजही नकाशात नसल्याने त्यांना निधी मिळत नाही, त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नात करण्यासाठीचा प्रस्ताव मागील अनेक दिवसापासून ग्रामविकास विभागात प्रलंबित आहे त्याला तात्काळ मान्यता द्यावी.
सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अनेक जन अडकलेले आहेत, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबरचे मुख्यालय स्थापन करावे तसेच यामध्ये बळी पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तातडीने मदत मिळण्यासाठी उपाययोजना करणे
उद्योगातील प्रदूषित पाण्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण, त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे तसेच जमिनीचा पोत देखील खराब होत आहे. तसेच कुरकुंभ, ता. दौंड येथील केमिकल कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने जागरूक राहून काम करावे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात यावी.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेती ही उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात या भागात दुष्काळ पडतो त्यामुळे या भागात बुडीत बंधारे बांधावेत तसेच चिबड जमीनीचे निर्मुलन करण्यासाठी शासनाने उपयोजना कराव्यात अशा विविध मागण्या सभागृहात चर्चे दरम्यान केल्या.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.