दौंड शहरातील भीम सैनिकांनी संविधान सन्मान रॅली काढून गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्या विरुद्ध केला निषेध व्यक्त.
By : Polticalface Team ,22-12-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २१ डिसेंबर २०२४ दौंड शहर व तालुक्यातील भिम सैनिकांनी संविधान संन्मान रॅली काढली व संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबत अवमानकारक टिपणी करणाऱ्या देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांच्या निषेधार्थ दौंड शहरात संविधान रॅली काढण्यात आली या प्रसंगी दौंड शहरातील भिम सैनिकांनी डॉ.आंबेडकर सम्मान रॅली मिरवणूक काढून निदर्शने दर्शवली असून संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबत अवमानकारक टिपणी करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला संविधान व डॉक्टर आंबेडकर सन्मान मिरवणूक काढून आंबेडकर आंबेडकर आंबेडकर अशा घोषणा देऊन छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण आवृत्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत जाहीर निषेध करण्यात आला यादरम्यान भारतीय बौद्ध महासभा व राजगृह बुद्ध विहार अध्यक्ष राजेश मंथने व सर्व भीमसैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्मा वंदना घेऊन जोरदार निषेध व्यक्त केला याप्रसंगी दौंड शहरातील भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. शनिवार दि २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजे सुमारास दौंड पोलीस निरीक्षक पवार साहेब यांनी सदर निवेदन स्वीकारले असून सदर मोर्चा संविधानिक पद्धतीने व लोकशाही मार्गाने जाहीर निषेध करून विरोध दर्शविला आहे या प्रसंगी दौंड शहरातील भिम सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता
दौड शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर विषयांकीत देशाचे ग्रहमंत्री अमीत शहा यांनी संसदेतील चर्चेदरम्यान संविधान निर्मात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने त्यांचा जाहीर निषेध करीत असून ग्रहमंत्री अमीत शहा यांनी संसद सदस्य व मंत्री पदाची शपथ ज्या संविधानाला स्मरण करून घेतली त्याच संविधान निर्मात्याचा त्यानी अपमान कोला असल्याने देशातील बहुजन समाज व संविधान प्रेमी- नागरीकांच्या भावना दुखावान्या आहेत त्यांनी बहुजन समाज व संविधान प्रेमी नागरीकांची जाहीर माफी मागून त्यांचे पदाचा राजीनामा महामहीम राष्ट्रपती महोदया यांचेकडे सुपूर्त करावा. वास्तविक पाहता संविधानातील तरतुदीनुसार गृहमंत्री यांनी देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता राखणे बाबत कटीबध असणे त्यांचे सांविधानिक कर्तव्य असतानाही त्यांनीच डॉ. आंबेडकरांन बाबत अपमानास्पद व्यक्तव्य केल्याने देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने महामहीम राष्ट्रपती महोदय यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी निवेदनाद्वारे दौंड शहरातील भिम सैनिकांनी मागणी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे
भारतीय बौद्ध महासभा दौंड अध्यक्ष राज राजगृह बुद्ध विहार दौंड भारतीय बौद्ध महासभा/बौद्ध धम्म सेवा संघ दौंड तसेच अमित सोनवणे सागर उबाळे भारत सरोदे दीपक सोनवणे सचिन खरात प्रकाश सोनवणे रवींद्र कांबळे विकास कदम शितलताई मोरे दीपक वाघमारे नागेश गायकवाड प्रशांत मोरे हुसेन खान निलेश शेंडे आशा मोहिते राजेश शेंडे राहुल धेंडे पांडुरंग बडेकर अनिल भालेराव शेलार चंद्रकांत शिंदे जितेंद्र डेंगळे पॅंथर जयदीप बगाडे विनायक मोरे विजय भालेराव सागर भोसले घनश्याम पाळेकर भीमराव मोरे इत्यादी भीमसैनिकांनी सदर निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
वाचक क्रमांक :