दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,31-12-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २७ डिसेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे मलठण गाव हद्दीमध्ये राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी तयार दारूचा साठा जवळ बाळगुन त्याची चोरून विक्री करीत आहे. अशी खात्रीशिर खबर दौंड पोलीस स्टेशन मध्ये हजर असताना सहायक. पोलीस फौजदार शिंदे याना दि २६ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने दौंड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला या दरम्यान मलठण येथील गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर आरोपी नाव व पत्ता बाळु अशोक दळवी रा.मलठण ता.दौंड जि.पुणे याचे विरुद्ध फियादी नाव व पत्ता - संजय बबन कोठावळे पोलीस नेमणुक दौंड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले
या बाबत अधिक माहिती अशी दौंड पोलीस स्टेशन मध्ये हजर असताना सहा. पोलीस फौजदार शिंदे याना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली की इसम नामे बाळु अशोक दळवी रा-मलठण यांच्या राहत्या घराच्या आडोशास गावठी हातभट्टीची तयार दारूचा साठा जवळ बाळगुन त्याची चोरून विक्री करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सहायक पोलीस फौजदार शिंदे यांनी दौंड पोलीस स्टाफ व दोन पंच घेऊन थेट मलठण दिशेने रवाना झाले. मलठण ता.दौंड जि.पुणे येथील बाळु दळवी यांचे घराचे भिंतीचेे आडोशास जावुन अचानक. छापा टाकला असता सदर ठिकाणी एक प्लॅस्टीकचे कॅन्ड घेवुन बाळू दळवी बसलेला आढळून आला मात्र पोलीसांना पाहताच सदर आरोपी गावठी हातभट्टी दारु प्लँस्टीकचे कॅन्ड तेथेच सोडुन पळुन लागल्याने पोलिसांनी त्याचा पाठला केला मात्र तो पळुन गेला त्या ठिकाणी दारूच्या अड्ड्यावर मिळुन आलेल्या प्लस्टीकचे कॅन्डाची दोन पंचा समक्ष पाहणी केली. असता त्यामध्ये प्रोव्हिबिशनचा माल मिळून आला तसेच त्यामध्ये एक 20 लिटर मापाचे प्लॅस्टीकचे कंन्ड. त्यामध्ये 15 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू प्रोव्हिबिशन माल सहायक पोलीस फौजदार संतोश शिंदे यांनी दोन पंचा समक्ष जप्त करून आरोपी इसम नामे बाळु अशोक दळवी रा.मलठण ता. दौंड जि.पुणे याचे विरूध्द मु. प्रो. अ.कलम 65 (ई) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार राऊत पोलीस हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :