दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

By : Polticalface Team ,16-01-2025

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १६ जानेवारी २०२५ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीबेल गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरीबेल गाडेवाडी येथील बंद घराची कडी कोयंड्डा तोडून अज्ञात चोरट्यांनी १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असल्या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सुमन दादा जेडगे वय ६७ वर्षे व्यवसाय शेती रा.गाडेवाडी बोरीबेल ता दौड जि.पुणे.यांच्या फिर्यादी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांनी दिली मौजे बोरीबेल गाडेवाडी ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीतून कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद घराची कड़ी कोयंडा तोडुन घरफोडी चोरीची घटना दि.१५/०१/२०२५ रोजी सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान घडली आहे. मौजे बोरीवेल गाडेवाडी ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीतून कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद घराची कड़ी कोयंडा तोडुन घरफोडी चोरी करून १ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असे एकुण १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या बाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांच्या कुटुंबातील सुन वैशाली हि शेजारी राहणारे चौधरी यांचेकडे शेतात कांदा खुरपण्यासाठी गेली होती. मुलगा नाना हा आमचे शेतात उसाची लागवड करण्यासाठी गेला होता, मोठा मुलगा बाळु घराजवळ असलेल्या शेतामध्ये नांगरणी करीत होता. पती दादा जेडगे हे शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी शेतात जात असतात नेहमी प्रमाणे फिर्यादी सुमन जेडगे स्वाता पती बरोबर शेळ्या मेंढ्या घेऊन रोड पर्यंत सोडून पुन्हा १२ वाजे सुमारास परत घरी आले. त्या वेळी घरांची सर्व लॉक व कडी कोयंडे तुटलेले होते व घराचे समोर वसरीला कागदपत्रे पडलेली व घराचे दरवाजे बंद असल्याचे दिसून आले. फिर्यादीने दरवाजा उघडुन पाहीले असता घरातील सर्व कपाटे उघडे होते. व कपडे अस्ताव्यस्त पडलेले पाहुन फिर्यादी सुमन जेडगे यांनी आरडा ओरडा केला. या वेळी मोठा मुलगा बाळु जेडगे याने आई रडत असल्याचा आवाज ऐकुन शेतातील काम सोडून घरी पळत आला. तेव्हा आई सुमन हिने घडला प्रकार मुलाला सांगितला. तेव्हा मुलगा बाळु याने घराच्या आजु बाजुला पाहणी केली असता तेथे कोणीही आढळून आले नाही. घरफोडी चोरी झाली असल्याची खात्री झाली असल्याने आराडा ओरडा ऐकूण गाडेवाडी येथील शेजारच्या बायका व माणसे घरी जमा झाले होते. बाळुने त्याची पत्नी वैशाली हिला शेतातून घरी घेवुन आला. घरफोडी चोरीची वार्ता सर्वत्र पसरली लोणारवाडी गाव पोलीस पाटील यांनी मोबाईल फोन वरून दौंड पोलीसांना संपर्क साधला बोरीबेल हद्दीत गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना घडल्या बाबत दौंड पोलीस ठाण्यात खबर दिली. घरफोडी चोरी बाबत मिळताच दौंड पोलिस घटनास्थळी पोहोचले घडलेल्या प्रकाराची चौकशी केली असता फिर्यादीने घरातील चोरीस गेलेली १ लाख ३७ हजार रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने यांची पाहणी केली असता फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे.(१) २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याची चैनीचा गंठण.(२) ६० हजार रुपये किमतीचे गळयातील सोन्याची पानपोत.(३) ६० हजार रुपये किंमतीची गळयातील सोन्याच्या दुसी. (४) ३६ हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुबे.(५) १२ हजार रुपये किंमतीचे दोन गळयातील सोन्याचे बदाम.(६) ३ हजार रुपये किंमतीची सोन्याची नाकातील नथ.(७) ६ हजार रुपये किंमतीची सोन्याचे डोर्लेमणी (८) २० हजार रुपये किंमतीची चांदीचे दोन बॅसलेट (९) २० हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायातील वाळे. (१०) २० हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायातील मासोळया विचव्या. (११) ९० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मन्यांचा गंठन. (१२) ६० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याची मोहन माळ.(१३) ६० हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याची बोर माळ.(१४) ६० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याची चैन (१५) ९० हजार रुपये किंमतीचे बोटातील सोन्याच्या दोन अंगठया.(१६) १५ हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे दोन बदाम (१७) १ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये ५०० रू दराच्या ३५० भारतीय चलनी नोटा असुन एकुण १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दि.१५/०१/२०२५ रोजी सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान मौजे बोरीवेल गाडेवाडी ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीतून कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद घराची कड़ी कोयंडा तोडुन घरफोडी चोरी करून चोरून नेले असल्याने फिर्यादी सुमन दादा जेडगे यानी दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यविरूध्द फिर्याद दिली असून दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.