शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,16-01-2025

शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता १६ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे मळद ता दौंड जिल्हा पुणे येथील सुषमा प्रदिप लेले यांच्या शेतात सालगडी म्हणून आण्णा शेंडगे रा.सिध्दटेक ता.कर्जत जि.अहिल्यानगर (पुर्ण नाव माहीत नाही) याने शेतमालकाच्या परस्पर घरातील वस्तू घेऊन निघून गेला ही घटना दि १९/१०/२०२४ रोजी घडली होती फिर्यादी किशोर शरद बखले वय ६५ वर्षे व्यवसाय आनंदनगर/सिंहगड रोड पुणे.४११०५७ सुखवस्तु रा.ए.२३ शंतनु अपार्टमेन्ट यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे दि १५ जानेवारी २०२५ रोजी आण्णा शेंडगे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी ची बहीण सुषमा प्रदिप लेले रा.मळद ता.दौड जि.पुणे.येथे त्यांची शेती व राहते घर आहे. दिनांक १४/१०/२०२४ रोजी सकाळी ०७/३० वाजे सुमारास फिर्यादी त्यांच्या घरी पुणे येथे असताना अचानक मळद गावातील रफिक सय्यद रा.मळद ता.दौंड यांचा फोन आला. तेव्हा त्याने सांगितले की, तुमची बहीण सुषमा प्रदिप लेले यांना हार्ट अटॅक आला असुन त्यांना आम्ही उपजिल्हा रूग्णालय दौंड येथे उपचारासाठी घेवुन आलो असता डॉक्टरांनी त्या मयत झाले आहेत असे सांगितल्याने सर्व नातेवाईक दौड येथे आले. बहिण सुषमा प्रदिप लेले यांचे शेतातील शेतगडी आण्णा शेंडगे याला सांगितले की आम्ही बहिणीचा अंत्य विधी करीत आहे. तु तोपर्यंत घरी थांबुन रहा असे सांगितले बहीण सुषमा लेले यांचा आमच्या रितीरिवाजा प्रमाणे अंत्यविधी उरकून दि.१५/१०/२०२४ रोजी सकाळी १०/०० वाचे सुमारास मळद येथे बहीणीच्या घरी गेलो असता तेथे आम्ही शेतगडी आण्णा शेंडगे याची भेट घेतली शेत कामाकरीता त्याला वापरण्याठी आमच्या मुलाचे नावे असेलेली होन्डा कंपनीची अँक्टीवा मोटार सायकल नं एम एच १२ आर.जे ७८२० दिली तसेच शेतखर्चासाठी १० हजार रुपये रोख रक्कम दिली आणि राहण्यासाठी बहीणीचे घराच्या चाव्या देवुन शेती पाहण्यासाठी सांगुन आम्ही पुन्हा पुणे येथे निघुन गेलो. त्या नंतर दिनांक १९/१०/२०२४ रोजी रात्री ०८/०० वाजे सुमारास रफिक सय्यद रा.मळद ता.दौड यांचा फोन आला तेव्हा त्याने सांगितले की तुमचा घरगडी आण्णा शेंडगे हा तुमच्या घरातील सामान व गाडी घेवुन निघुन गेला आहे. असे सांगितले नंतर फिर्यादी ने आण्णा शेंडगे याला फोन केला असता त्याचा मोबाईल नंबर बंद येत होता. त्यानंतर मी दि.२०/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजे सुमारास पुणे येथुन मळद येथे आलो असता बहीणीच्या घरातील टि.व्ही. आरसा, पिठ चक्की, मिक्सर असे साहित्य घरात नसलेचे दिसुन आले त्यामुळे माझी खात्री झाली की आण्णा शेंडगे रा.सिध्दटेक याने बहीण सुषमा लेले हिच्या घरातील वापरासाठी दिलेले सामान अप्रमाणीकपणे घेवुन गेला आहे. फिर्यादी ने आण्णा शेंडगे यांच्या गावी आजुबाजुला आज रोजी पर्यंत शोध घेतला परंतु तो मिळुन आला नसल्याने आज रोजी दौंड पोलीस स्टेशन मध्ये आण्णा शेंडगे याचे विरुद्ध तक्रार दाखल केली असून त्यामध्ये अप्रमाणीकपणे घेवुन गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे. (१) २० हजार रुपये किंमतीची TCL कंपनीची ५० इंची असलेला जु.वा.कि.अ (२) १ हजार रुपये किमतीचा आरसा जु.वा.कि.अ (३) ५० हजार रुपये किंमतीची एक निळया रंगाची होन्डा कंपनी अँक्टीवा स्कुटर रजि.नं एम.एच १२ आर.जे ७८२० अशी जु.वा.कि.अ (४) १० हजार रुपये किंमतीची एक पिठाची चक्की (फ्लोअर मिल) जु.वा.कि.अ (५) २ हजार रुपये किंमतीचा एक मिक्सर जु.वा.कि.अ असे एकुण ८३ हजार रूपये किंमतीच्या येणप्रमाणे वरील वर्णनाच्या वस्तु घेऊन दि.१९/१०/२०२४ रोजी सकाळी ०८ वाजे पुर्वी मौजे मळद ता. दौंड जि.पुणे येथील बहीणीच्या घरातुन शेतगडी आण्णा शेंडगे रा.सिध्दटेक ता. कर्जत जि.अहिल्यानगर (पुर्ण नाव माहीत नाही) यांना वापरण्यासाठी दिल्या असता त्याने मालकाच्या परस्पर त्या वस्तु अप्रमाणीकपणे आम्हाला कोणतीही खबर न देता घेवुन गेला आहे. म्हणुन त्याचे विरूध्द फिर्यादीची तक्रार आहे. असे नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.