मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.

By : Polticalface Team ,16-01-2025

मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. सोमवार, दि.१३ जानेवारी, २०२५ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे येथे मूक नायक मैत्री संघ आणि संघ नायक न्यूज आयोजित मूक नायक स्थापना दिनानिमित्त संघ नायक न्यूजच्या ८ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने, संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार यांच्या हस्ते करण्यात आले, संघ नायक न्यूजचे सहाय्यक संपादक अमोल लोंढे यांनी स्वागताध्यक्षाची भूमिका बजावली तर ज्येष्ठ समाज सेवक विष्णूदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १०५ वा मुक नायक स्थापना दिन आणि संघ नायक न्यूज चा ०८ वर्धापन दिन उत्साहात सासवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा.संदीप टिळेकर,ॲड त्रिरत्ना बागूल, डाॅ.गौतम वनंजे, विलास बोकेफोडे, शिवाजी काळे, अनिल गायकवाड, बाळकृष्ण काकडे यांनी मनोगते व्यक्त करत, संघ नायक न्यूजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित नागरिकांना पत्रकारीतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रिपब्लिकन नेते पंढरीनाथ जाधव,प्रा. बाबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिव व्याख्याते संजय भालेराव, राष्ट्रीय प्रबोधनकार श्रीकांत होवाळ यांनी पुरस्कारार्थी आणि उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी डाॅ.कुमार लोंढे, ॲड. स्वप्निल बोत्रे, महादेव खेंगरे पाटील, संतोष महाडीक, विलास कोळपे, दादासाहेब गायकवाड, प्रदीप दिवेकर, राजाभाऊ आडागळे, रामदास तुपे,मोहन चिंचकर, दत्तात्रय डाडर,अरुण खरात, दीपक धेंडे, छाया नानगुडे, हनुमंत वाबळे, उत्तम यादव, राजेखान पटेल, कृष्णा फुलवरे, विनोद बेंगळे, सुषमा मस्के तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८० लोकांना संघ नायक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वर्धापन दिनाला संबोधन करताना संपादक प्रा.सदाशिव कांबळे म्हणाले की, संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा सन्मान चिन्हांसाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी १० हजार रुपये तर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी ५ हजार रुपये आर्थिक सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. राजर्षी शाहू महाराजांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना मूक नायक पाक्षिक सुरु करण्यासाठी २५०० रुपये आर्थिक मदत केली होती. तेव्हाच ३१ जानेवारी, १९२० रोजी मूक नायकचा प्रवास सुरु झाला होता. संघ नायक न्यूजला पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे. ज्यांनी आज पर्यंत संघ नायक न्यूजला जगवले, त्यांना मी कदापीही विसरणार नाही. आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,आर्थिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतो. संघटनेत तथा विविध क्षेत्रात कार्य करताना, प्रमुख भूमिका बजावणारे, हे ख-या अर्थाने संघ नायक आहेत, म्हणूनच त्यांच्या अनमोल कार्यासाठीच संघ नायक गौरव पुरस्कार आम्ही देत आहोत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी जर मूक नायक सुरु केला नसता तर बहुजन पत्रकारीतेचा उदय झालाच नसता. संघ नायक न्यूजने पुणे येथे ३१ जानेवारी,२०२० रोजी मूक नायकचे शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी ३१ जानेवारी साजरा करुन डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे. मूक नायकचा वारसा आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊ असे अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र रणधीर, सूरज गवळी, मल्हारी सोनवणे, आदिनाथ सरवदे, तुकाराम खाजेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.