दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण.

By : Polticalface Team ,17-01-2025

दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १६ जानेवारी २०२५ दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेत ७ वी मध्ये शिकत असलेला साईराज अरूण भंडलकर वय १२ वर्ष नवयुग विद्यार्थी वस्तीगृह मधुन बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार आई वडील मुलाला भेटायला गेल्यावर.नवयुग वस्तीगृहातून समजला असल्याने आई नंदा अरूण भंडलकर व अरूण भंडलकर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली हि घटना ११ डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याची माहिती मिळाल्या पासुन पालकांनी मुलगा साईराज अरूण भंडलकर याचा शोध लागत नसल्याने दौंड पोलीस स्टेशन येथे धाव घेतली या मध्ये नेमका दोष कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे विध्यार्थी साईराज भंडलकर याचा की लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक नवयुग वस्तीगृह व्यवस्थापकाचा अशा अनेक उलटसुलट चर्चा दौंड शहरात होत असुन नवयुग वस्तीगृहाच्या विध्यार्थी मुलांची सुरक्षितता बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने फिर्यादी सौ.नंदा अरुण भंडलकर वय- 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा.चौफुला,धायगुडेवाडी ता.दौड जिल्हा पुणे दौड पो स्टे गु.र.नं 32/2025 भारतीय. न्याय संहिता कलम 137 (2) अंन्वये दौंड पोलीस ठाण्यात दि १५ जानेवारी २०२५ रोजी अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हकीकत समक्ष दौड पोलीस स्टेशन मध्ये हजर होवुन फिर्यादी सौ नंदा अरूण भंडलकर व अरूण भंडलकर यांचेसह एकत्रित राहण्यास आहे. मी व माझे पती असे आम्ही शेतमजुरी काम करुन त्यावर उदरनिर्वाह करतो. माझा मुलगा नामे साईराज अरुण भंडलकर वय-12 वर्षे हा दौंड भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेत इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेत असुन तो शाळेतील नवयुग विद्यार्थी वस्तीगृहात राहण्यास आहे. आम्ही आधुन मधुन त्यास भेटण्यासाठी जात येत असतो. दि.13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याचे सुमारास मी व माझे पती अरुण मंडलकर असे आम्ही माझा मुलगा साईराज याचा वाढदिवस असल्याने वाढदिवसा निम्मीत त्यास घरी घेवून जाण्यासाठी भिमनगर दौड येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील तो राहत असलेल्या नवयुग विद्यार्थी वस्तीगृह येथे गेलो असता वस्तीगृहाचे शिक्षक जगदीश सोनलकर यांनी आम्हाला सांगीतले की, तुमचा मुलगा साईराज अरुण भंडलकर हा दि.11/12/2024 रोजी सायंकाळी 05/30 वाजण्याचे सुमारास वस्तीगृहातून निघुन गेला आहे. तो तुमच्या घरी आला नाही का आम्ही तुम्हाला बरेचवेळा फोन लावला होता परंतु तुमचा फोन बंद लागत होता असे सांगीतले त्यानंतर आम्ही मुलगा साईराज अरुण मंडलकर यांचा शोध घेतला परंतु ती मिळुन आला नाही त्यावेळी माझी खात्री झाली की, माझा मुलगा साईराज अरुण भंडलकर क्य- 12 वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन कशाचे तरी आमिष दाखवुन कालीतरी फुस लावून आमचे कायदेशीर रखयालीतून पळवुन नेले असल्याची माझी खात्री झाली आहे. मुलगा साईराज याचे वर्णन खालील प्रमाणे नावः साईराज अरुण भंडलकर वय 12 वर्षे रंग सावळा, सडपातळ, केस काळे बारीक, उंची 145 सेमी, अंगाने कपाळावर उजवे बाजुस जुन्या जखमेचे वण असे वर्णन नमूद करण्यात आले असून दि.11/12/2024 रोजी सायंकाळी 05/30 वाजण्याचे सुमारास मौजे भिगनगर दौड ता. दौड जि.पुणे येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग विद्यार्थी वस्तीगृह मधुन माझा मुलगा नामे साईराज अरुण मंडलकर वय-12 वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन कशाचे तरी आमिष दाखवुन कसलीतरी फुस लावुन कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले आहे. म्हणून माझी त्या अज्ञात इसमा विरुध्द तक्रार आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पो ना रोटे पुढील तपास पोसई कदम करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.