कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे.
By : Polticalface Team ,18-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १८ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कोशिमघर ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या शेतातील तरकारी घेऊन बाल आनंदी बाजार भरविण्यात आला.हा विविध प्रकारच्या भाजी मंडई बाजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी
आज शनिवार दि.१८/०१/२०२५ रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान शाळेच्या प्राणांगणात घेतला. या बाल आनंदी बाजाराचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. या चिमुकल्या विद्यार्थी व्यापाऱ्यांची मांदीआळी पाहुण व व्यवहार बोली भाषा ऐकून उपस्थित समस्त गावकरी व पालक देखील भारावून गेले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा या बाल आनंदी बाजार उपक्रमाचे व शिक्षकांचे उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.
या तरकारी बाजार उपक्रमाच्या माध्यमातून व बालआनंद मेळावा अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत म्हणून आनंदी बाजार आणि खाऊ गल्ली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सांगितले.
या बाजारात मुलांनी मेथी पालक टोमॅटो वांगी बटाटा कोथिंबीर मिरची कांदा चिकू पावटा यांसारख्या अनेक भाज्या विकायला आणल्या होत्या. त्याच बरोबर खाऊ गल्ली मध्ये छोटे स्टॉल लावून विद्यार्थी मुलांनी वडापाव पॅटीस ओली सुकी भेळ पाणी पुरी इडली चटणी आप्पे गुलाबजाम जिलेबी भाकरवडी चॉकलेट बिस्किटे आवळा लोणचे असे वेगवेगळे पदार्थ बनवले होते. या प्रसंगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पालकांनी आणि ग्रामीण भागातील शेतकरयांनी देखील खाऊ गल्लीत विविध पदार्थांची चटकदार चव घेऊन आनंद घेतला.
भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, अहो काका या ना वडापाव घ्या ना चटकदार चटपटीत भेळ घ्या अशा प्रकारे मोठ मोठ्या आरोळ्या देऊन ग्राहकांची विध्यार्थी चिमुकल्यांच्या आवाजाने मने जिंकली. या प्रसंगी प्राथमिक शाळेचा परिसर दणाणून गेला होता.
बालगोपाळांनी भरवलेल्या या भाजी मंडई बाजारास गावातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ पालकांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
वाचक क्रमांक :