दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.
By : Polticalface Team ,01-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०२ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे पेडगाव येथे घडलेल्या खुन प्रकरणातील व दोन वर्षांपासून फरार असलेल्या ३०२ गुन्ह्यातील आरोपी अखेर दौंड पोलिसांच्या जाळ्यात. या बाबत अधिक माहिती अशी की दि.०४/०३/२०२३ रोजी १७:०० वा.ते दि. ०६/०३/२०२३ रोजी १७:३० वा.चे सुमारास मौजे पेडगाव ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत रामभाऊ सोनबा गोधडे यांचे मालकीचे जमीन गट नंबर २७३ मध्ये राहत असलेले दिलीप शंभु सांगळे यांचेकडे कोळसा काम करणारे लेबर १) हरिशचंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे रा.कारले, गंगेचीवाडी ता.पेन जि.रायगड २) लिला उर्फ रूपाली गणेश वाघमारे रा.भुनेश्वर ता.रोहा जि.रायगड यांनी त्यांचे सोबत काम करणारा लेबर नामे चंदर गणपत जाधव वय ६० वर्षे रा.वांद्रे ता.मुळशी जि.पुणे याचा कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी कोणत्या तरी हत्यारांने त्याचे उजव्या डोळया जवळ गळ्यावर व डावे हाताचे खांदयावर गंभीर मारहाण करुन खून करून त्याचे प्रेत ऊसाचे पाचटा खाली लपवून ठेवुन पळून गेले होते.त्या बाबत त्यांचे विरुध्द दिलीप शंभु सांगळे यांनी दौंड पोलीस स्टेशन गु.र. नंबर १७७/२०२३ भा.द.वि.क ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचे आरोपी मार्च २०२३ मध्ये गुन्हा केले पासुन फरार होते. गुन्हया मधील मुख्य आरोपी हरिशचंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे रा.कारले, गंगेचीवाडी ता.पेन जि. रायगड याचा बदामी कनार्टक राज्यात शोध घेवुन त्यास दिनांक २४/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती
तसेच यातील फरारी महिला आरोपी नामे रूपाली उर्फ लिला गणेश वाघमारे वय ३५ वर्षे रा.भुनेश्वर ता. रोहा जि.रायगड ही अनंतपुर, राज्य आंध्रप्रदेश येथुन रेल्वेने दौंड मार्गे रायगड येथे जात असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच दौंड पोलीस पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ पाठवुन सदर महीला आरोपीस मुंबई बेंगलोर उदयान एक्सप्रेस मधुन ताब्यात घेवुन तिस सदर गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार सोा, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस दौंड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पो.हवा. किरण पांढरे, पो. हवा विनोद चव्हाण, पो. हवा किरण ढुके, पो.कॉ संजय कोठावळे, पो.कॉ योगेश पाटील पो.कॉ चितारे म.पो.कॉ मोकळे यांनी मिळून केली आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष