पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.

By : Polticalface Team ,08-02-2025

पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त तक्षशिला बुध्द विहार, पंचशिल नगर येथे सर्व समाज बांधव एकत्र येऊन रमाई जयंती साजरी केली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती सरिकाताई राजेंद्र पानसरे व उपस्थीत सर्व महिलांचे हस्ते करण्यात आले. या वेळी फुले शाहू आंबेडकर चळळीतील थोर विचारवंत जेष्ठ अभ्यासक प्राचार्य विजयराव दादू रोकडे सर यांचे माता रमाई यांचे जीवनावर, समाज कार्यावर आधारित सुंदर व्याख्यान झाले. या दरम्यान माई रमाईचा त्याग, समाजासाठी त्या वेळी त्या काळी पोटची चार मुलं गमावून सुद्धा संसारात कुठलीही अपेक्षा न ठेवता कष्ट करून बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी केलेली आर्थिक मदत. बाबासाहेबाना कायम दिलेली बहुमूल्य साथ संघर्षमय माता रमाई यांचा एकंदरित संपूर्ण जीवन प्रवास या विषयावर प्राचार्य रोकडे सरांनी उपस्थित बौद्ध महिलांना व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले या प्रसंगी विहारातील वातावरण धम्ममई झाले होते. या प्रसंगी विहाराचे जेष्ठ सभासद रोहिदास पानसरे कृष्णा पानसरे अरुण पानसरे गौतम पानसरे विजय पानसरे पाटस ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राजेश सोनवणे यांचे हस्ते प्राचार्य रोकडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास महिलांचा विशेष सहभाग व उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विहाराचे सभासद श्रेयस पानसरे सूरज पानसरे शिवधन पानसरे मंगेश पानसरे सुजित पानसरे शैलेश पानसरे व इतर सर्व युवा सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन विहाराचे मयुर पानसरे यांनी केले. शेवटी सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पाटस येथील तक्षशिला बुध्द विहार राहूल युवक मंडळाचे सर्व कार्यकारिणी सभासद यांचे वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.