कडेठाण येथील लता बबन धावडे यांचा वन्य प्राण्यांच्या हल्लात मृत्यु झाला नाही. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर अहवाल प्राप्त. दगडाने ठेचुन जिवे ठार मारले.

By : Polticalface Team ,04-03-2025

कडेठाण येथील लता बबन धावडे यांचा वन्य प्राण्यांच्या हल्लात मृत्यु झाला नाही. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर अहवाल प्राप्त. दगडाने ठेचुन जिवे ठार मारले.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड ता ०४ मार्च २०२५ दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मौजे कडेठाण येथील एका शेतकरी कुटुंबातील लता बबन धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडल्या बाबत. पुणे जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रभर वर्तमान पत्राच्या आणि सोशल मीडिया चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या 

मात्र या संदर्भात यवत पोलीस प्रशासनाने कायदेशीर मार्गाने तपास चौकशी केली असता प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर जि नागपुर यांचा अहवाल प्राप्त झाल्याने यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण. यांनी सखोल चौकशी करून सदर घटनेच्या मागील मुख्य आरोपीला शोधून काढले असून.

दि.०४/०३/२०२५ रोजी ०२:१४ वा यवत पोलीस स्टेशन येथे खून प्रकरणी गु.र.नं.२२८/२०२५ भा न्या सं क १०३,६१ (२),३(५) अंन्वये आरोपी १) सतिलाल वाल्मीक मोरे वय ३० वर्षे व्यवसाय मजुरी  मुळ रा तिकी ता चाळीसगाव जि धुळे सध्या रा कडेठाण ता दौड जि पुणे २) अनिल  पोपट धावडे वय ४० वर्षे, रा. कडेठाण ता. दौड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दि.०७/१२/२०२४ रोजी १५:०० वाजे सुमारास मौजे वरखंड ता दौड जि पुणे इसम दादा लालासो दिवेकर यांचे जमीन गट नं ९७० येथील चारीत मयत लता बबन धावडे यांचा मृतदेह सापडला होता. सलीम गफुर शेख पोलीस उपनिरिक्षक नेमणुक यवत पोलीस स्टेशन अंकित पाटस दुरक्षेत्र यांनी सखोल चौकशी करून खुनाचा तपास लावला आहे.

तत्पूर्वी बिबट्या नरभक्षक असल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकरी भैभीत झाला असल्याची चर्चा परीसरात वाऱ्यासारखी पसरली होती फॉरेस्ट वन खात्याने येथे पिंजरे लावले. दरम्यान ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालात मात्र महिलेचा मृत्यू हा डोक्याला आणि तोंडाला जखम झाल्यामुळे झाला असल्याचे दिसून आले. हा अहवाल आल्यापासून पोलिसांना थोडा संशय निर्माण झाला होता.

मात्र नागपूरच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे लाळेच्या नमुन्याबाबत येणाऱ्या अहवालासंदर्भात प्रतिक्षा होती. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याचा तपासणी अहवाल आला. त्यामध्ये कोणत्याही प्राण्याने चावा घेतला नसून तशा स्वरूपाचा कोणताही लाळेचा नमुना या ठिकाणी आढळून आला नसल्याचे फॉरेन्सिक तपासणीत दिसून आले होते. हा अभिप्राय मिळाल्याने या महिलेचा मृत्यू हा बिबट्याने चावा घेतल्याने झाला नसून याला वेगळेच काहीतरी कारण असावे असा पोलिसांना संशय आला आणि त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू झाला.

०३ मार्च २०२५ रोजी हा तपास सुरू असताना फौजदार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली. धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तिकी या गावचा सतीलाल वाल्मीक मोरे हा तीस वर्षीय मजूर पोलिसांना संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने घडाघडा या खुनाची कबुली दिली. अनिल पोपट धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. ते शेतामध्ये वारंवार एकमेकांना भेटत होते. ०७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कडेठाण गावच्या हद्दीत मालक अनिल धावडे यांच्या गोठ्यावर काम करत असताना अनिल धावडे यांनी मला बोलावले आणि सांगितले की, माझी चुलती लता बबन धावडे ही मला भेटायला येत नाही. आणि वरून पैशाची मागणी करते. तुला मी दीड लाख रुपये देतो. आपण दोघे मिळून तिचा खून करू. तू मला मदत कर असे म्हणाल्यानंतर या दोघांनी जीवे मारण्याचा कट रचला आणि अनिल धावडे यांच्या सांगण्यावरून लता धावडे हिला उसाच्या शेताजवळ बोलावून तिचे तोंड दाबले. तिला बेशुद्ध केले आणि दोघांनी मिळून दगडाने चेहरा आणि डोके ठेचून खून केला व अनिल धावडे यांनी मोरे याला सांगितले की, कोणी विचारले तर बिबट्याने मारले असे सांग. सदर महिलेच्या खूनप्रकरणी यवत आणि पाटसच्या पोलिसांनी आणि नागपूरच्या प्रयोगशाळेने ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्पक्ष रित्या केलेल्या तपासाने उघडकीस आणला आहे 

(यवत पोलीस प्रशासना मार्फत मिळाळेली अधिक माहिती अशी की नमुद केले तारिख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजि. नं २४८/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम - १९४ अन्वये मयताचा तपास करीत असताना तपासात मयतास कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून मृत्यु झाला नसले बाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर जि नागपुर अहवाल प्राप्त झाल्याने सदर मयताा बाबत सखोल तपास केला असता  बाजुस नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी अनैतिक संबंधाचे कारणा वरून आपसात संगनमत करून मयत हिस जिवे ठार मारण्याचा कट रचुन तिचे तोंड व डोके दगडाने ठेचुन तिला जिवे ठार मारले आहे - वगैरे मजकुराने सदरचा गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पी.एच.संपांगे सहायक पोलीस निरिक्षक यवत पोलीस स्टेशन हे करीत आहे. पोहवा एस बी कदम प्रविण संपांगे सहा. पोलीस निरिक्षक करीत आहेत).


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.