उरुळी कांचन येथील समता सैनिक दलाचे जवान.पर्यटन उपाध्यक्ष भीमराव घायवन यांना (महाड) किल्ले रायगडावर विरगती प्राप्त.
By : Polticalface Team ,24-03-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ मार्च २०२५ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. पुर्व हवेली तालुका अंतर्गत ग्रामशाखा उरुळी कांचन. समता सैनिक दल, यशोधरा सिद्धार्थ सामाजिक संस्था, रमाई महिला मंडळ उरुळी कांचन तुपे वस्ती यांच्या विद्यमाने आज रविवार दिनांक 23/3/2025 रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता साप्ताहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे येथील समता सैनिक दलातील जवान व शाखेचे पर्यटन उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सदैव तत्पर व कार्यरत असणारे कालकथित भीमराव आडकुजी घायवन यांचे दिनांक 20 मार्च 2025 रोजी (महाड) किल्ले रायगडावर विरगतीला प्राप्त झाले
या बाबत अधिक माहिती अशी की उरुळी कांचन व परीसरातील अनेक भीम अनुयायी दि २० मार्च रोजी महाड चवदार तळे या ठिकाणी मान वंदना देण्यासाठी गेले होते. या वेळी जवान भीमराव घायवन हे किल्ले रायगड पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा वाऱ्याच्या झोकाने स्वतःचे संतुलन घसरल्याने हि घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
कालकथित भीमराव आडकुजी घायवन यांचे रायगड या पवित्र ठिकाणी त्यांचे निर्वाण झाले. त्यामुळे त्यांच्या प्रित्यर्थ उरुळी कांचन येथे शोक सभेचा कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी उपस्थितांनी त्यांच्या समाज कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या गैर हजरीमुळे उरुळी कांचन ग्राम शाखा पंचक्रोशीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या धम्मकार्याच्या तत्कालीन आठवणींना समाज कधीच विसरू शकत नाही शोक सभेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या
कालकथित भीमराव आडकुजी घायवन हे समता सैनिक दलाचे जवान असल्याने सर्व जवानांनी त्यांना मानवंदन व सलामी दिली या प्रसंगी समता सैनिक दलाचे जवान किशोर कांबळे माजी सेवानिवृत्त अधिकारी पाटोळे साहेब विशाल गायकवाड प्रमुख उपस्थिती निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत कदम साहेब संस्थेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य बाबासाहेब मारुती कांबळे संतोष बडेकर संस्थेचे अध्यक्ष कैलास शिंदे कोषाध्यक्ष सखाराम ओव्हाळ परमेश्वर कदम संतोष मोरे अभिमन्यु शिंदे तानाजी लोखंडे अनिवार कांबळे निलिमाताई कांबळे उषाताई उबाळे आरती मोरे माधवी ताई कांबळे प्रणिता ताई शिंदे तसेच कालकथित भीमराव आडकुजी घायवन यांची पत्नी माधुरी ताई भीमराव घायवन यांचे बंधु पै पाहुणे आप्तेष्ट आदी समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व युवा तरुण कार्यकर्ते आणि मान्यवरांनी बुद्ध वंदना घेऊन अखेरची धम्म पालन गाथा घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
वाचक क्रमांक :