राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन पालघर येथे होणार. अध्यक्ष जी. के. थोरात

By : Polticalface Team ,24-03-2025

राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन पालघर येथे होणार. अध्यक्ष जी. के. थोरात दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे पालघर येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष जी.के.थोरात यांनी दिली या बाबत अधिक माहिती अशी की राज्यातील अनेक शैक्षणिक प्रश्न प्रलंबित असून यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यासंदर्भात श्री. स.तु.कदम कला व वाणिज्य महाविद्यालय पालघर येथे राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात सर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत ते बोलत होते. शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी पालघर येथे या एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले जाणार असून या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात अनेक मान्यवरांना निमंत्रित केले जाणार आहे. तसेच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भाची निवेदने राज्य शासनास दिली जाणार आहेत. या अधिवेशनाचे निमंत्रण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांनाही देण्यात आले आहे. आजच्या या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, स्थळ,प्रमुख पाहुणे, प्रमुख शिक्षणतज्ञ यांच्या उपस्थितीबाबत तसेच टीडीएफ च्या वतीने सेवाजेष्ठ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवनगौरव तसेच संघटनेसाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये मागील बैठकीचे इतिवृत्त राज्याचे कार्यवाह के.एस. ढोमसे सर यांनी वाचले हे इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष नरसू पाटील यांनी एक दिवशीय अधिवेशने आयोजित करून प्रलंबित शैक्षणिक प्रश्न शासन दरबारी मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जी. के. थोरात सर यांनी आगामी काळामध्ये अधिवेशनाचे आयोजन करून विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नाबाबत तज्ज्ञांची चर्चा घडवून आणून शासन दरबारी या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. तसेच संघटनेसाठी अविरतपणे कार्य करणारे शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल असे मत व्यक्त केले. यावेळी राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष श्री. नरसू पाटील,नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पवार, मुंबई विभाग अध्यक्ष नानासाहेब फुंदे, राज्य खजिनदार निशांत रंधे, कोकण अध्यक्ष सागर पाटील, पालघर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष गणेश प्रधान, कार्याध्यक्ष फावडे सर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे, पुणे शहर जुनि. कॉलेज टीडीएफ चे अध्यक्ष प्रा.शशिकांत शिंदे तसेचयावेळी डॉ.ए.डी. नांद्रे,सहसचिव रोहित जाधव,ज्योती नेटवटे,मंगला जाधव, मायकल सर राज्य टीडीएफचे इतर पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष