कुरकुंभ एमआयडीसी. ईशा ॲग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीकडून कामगारांची बेकायदेशीर हकालपट्टी. महाराष्ट्र शासन कामगार उपायुक्तांनी दिले सुनावणीचे नोटीस.

By : Polticalface Team ,28-03-2025

कुरकुंभ एमआयडीसी. ईशा ॲग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीकडून कामगारांची बेकायदेशीर हकालपट्टी. महाराष्ट्र शासन कामगार उपायुक्तांनी दिले सुनावणीचे नोटीस. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता २८ मार्च २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ ता. दौंड, जि.पुणे येथील एम.आय.डी.सी. येथील ईशा ॲग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीतील काही कामगारांना कोणतीही सूचना व प्रत्यक्ष नोटीस न देता कामगारांना कंपनीतून काही महिन्यापूर्वी तडका फडकी कामावरून काढून टाकले आहे. अशी माहिती मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका अध्यक्ष भारत सरोदे यांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की कुरकुंभ एमआयडीसी परिसरात असलेल्या ईशा ॲग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीने सदर कामगारांना त्यांचे ग्रज्यूटीची रक्कम व पी.एफ दिलेला नाही. फक्त एक महिन्याचा पगार देऊन हकालपट्टी केली असल्याने. या कामगारांनी कंपनीकडे वेळोवेळी विचारणा केली असता कामगांराना कंपनीकडून उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सदर कामगारांनी चिंता व्यक्त करत. मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका अध्यक्ष मा भारत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळण्या बाबत हक्काचा लढा सुरू केला आहे. मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका यांच्या तर्फे उपअभियंता कुरकुंभ एम.आय.डी.सी. व मा.तहसिलदार अरुण शेलार यांना वेळोवेळी तक्रारी अर्ज व निवदेन दिली असताना देखील सदर कंपनीकडून वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. सदर कंपनीमध्ये गेली ६ ते १० वर्षा पासून हे कामगार ब्रेक न घेता सलग काम करीत होते परंतू कंपनी व्यवस्थापकांनी या कामगारांना कायम स्वरूपी रुजू करण्या एवजी अचानक पणे कामावरून कमी करुन घरी बसवले आहे ग्रज्युटी कायदा १९७२ अंतर्गत ०५ वर्षा पुढील सलग काम करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करताना त्यांची संपूर्ण ग्रॅज्युटीची रक्कम व पी.एफ तसेच तीन महिन्याचा पगार देणे बंधनकारक असताना सदर कंपनीने या मजुर कामगारांनवर अन्याय केला आहे त्यामुळे ईशा अँग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. यांच्या विरोधात कामगारांच्या न्याय हक्कासाठी व कामगारांना न्याय मिळणेसाठी दि.११/०२/२०२५ रोजी ईशा अँग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीच्या विरोधात. मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका यांच्या वतीने तहसिलदार कार्यालय दौंड येथे एक दिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली असताना कंपनी व्यवस्थापकांनी बघ्याची भूमिका घेऊन सदर पिढीत मजुर कामगारांना दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा होत आहे. या होणाऱ्या अन्याया विरुद्ध. महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका अध्यक्ष भारत सरोदे यांनी दाद मागितली होती त्या अनुषंगाने दि २७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र शासन कामगार उपायुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी कामगारांसह उपायुक्त यांची भेट घेतली मात्र या वेळी ईशा अँग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापक किंवा अन्य प्रतिनिधी या कार्यालयात सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. मात्र पिढीत कामगार यांच्याशी उपायुक्त अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असुन दि ०८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र शासन कामगार उपायुक्त कार्यालय संगमवाडी पुणे या ठिकाणी हजर राहावे अशी नोटीसाद्वारे सूचना देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष भारत सरोदे यांनी दिली. कुरकुंभ एमआयडीसी येथील ईशा ॲग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीने कामगारांवर अन्याया करु नये ? कमी केलेल्या कामगारांना तत्काळ पून्हा कामावर रुजु करून घ्यावे व ग्रॅच्युइटीची संपूर्ण रक्कम व त्यांचा पी.एफ कामगारांना देण्यात यावा. कायद्या नुसार कामगारांच्या हिता विरोधात असणाऱ्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून. ईशा अँग्रो (इफको) गो ग्रीन प्रा.लि. कंपनीने सकारात्मक निर्णय घ्यावा व कामगारांना न्याय द्यावा अशी भूमिका मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका अध्यक्ष भारत सरोदे यांनी घेतला असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष