होणारा नवरा पसंत नसल्याने महिलेने दिली जिवे ठार मारण्याची सुपारी. सुपारी घेणा-या आरोपींना यवत पोलीसांनी केले जेरबंद.
By : Polticalface Team ,31-03-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ३१ मार्च २०२५ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल साई मिसळ समोर सोलापूर-पुणे हायवे रोडवर दि.२७/०२/२०२५ रोजी सायं.०७.५० वा.चे सुमारास पांढरे रंगाची चारचाकी गाडीतील अज्ञात इसमांनी गाडीचे खाली उतरून. जर तु मयूरीशी लग्न केले तर तुला दाखवितो असे म्हणून फिर्यादी नामे सागर कदम यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याची घटना घडली होती
फिर्यादी नाव सागर जयसिंग कदम वय २८ वर्ष, व्यवसाय हॉटेल कुक,रा.माहीजळगाव, ता.कर्जत जि.अहिल्या नगर यांच्या फिर्यादी वरून दि.०१/०३/२०२५ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.२१७/२०२५ भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ३५१ (२) (३), ३(५) अन्वये. आरोपी १) आदित्य शंकर दांगडे, वय १९ वर्षे, रा.गुघलवडगाव ता.श्रींगोदा जि.अहिल्यानगर २) संदीप दादा गावडे, वय ४० वर्षे, रा.गुघलवडगाव ता.श्रींगोदा जि.अहिल्या नगर ३) मयुरी सुनिल दांगडे, रा.ता. श्रींगोदा जि. अहिल्या नगर ४) शिवाजी रामदास जरे,वय ३२ वर्षे,रा. पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा जि.अहिल्या नगर ५) इंद्रभान सखाराम कोळपे, वय ३७ वर्षे, रा.पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा जि.अहिल्या नगर ६) सुरज दिगंबर जाधव वय ३६ वर्षे, रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहिल्या नगर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातील अटक आरोपी क.१ व २ यांना दि.२८/०३/२०२५ रोजी १४.१७वा.स्टे.डा.क्र.२५/२०२५ अन्वये अटक करण्यात आली आहे. व आरोपी क. ४ याला दि.२९/०३/२०२५ रोजी १४ : ४७वा.स्टे.डा.क्र.१७/२०२५ अन्वये अटक करण्यात आली आहे. तसेच यातील आरोपी क्र.५ व ६ यांना दि.२९/०३/२०२५ रोजी २०: ३१ वा. स्टे.डा.क. २४/२०२५ अन्वये अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी क्र.३ मयुरी दांगडे ही अदयापर्यत फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती कशी की गुन्हयातील संशयित आरोपी नामे आदित्य शंकर दांगडे, वय १९ वर्षे, रा.गुघलवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्या नगर याला सदर गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडे चौकशी केली असता सदर आरोपीने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे
सदर गुन्हयाचे तपास दरम्यान दि.२८/०३/२०२५ रोजी संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे, वय १९ वर्षे, रा. गुघलवडगाव ता. श्रींगोदा जि. अहिल्यानगर यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा मयुरी सुनिल दांगडे, रा.ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर आणि संदीप दादा गावडे, वय ४० वर्षे, रा.गुघलवडगाव ता. श्रींगोदा जि.अहिल्यानगर यांचे सांगणेवरून मयुरीला होणारा नवरा सागर कदम हा पसंत नसल्याने १ लाख ५० हजार रू.ची सुपारी घेवून मी व १) शिवाजी रामदास जरे, रा.पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर २) इंद्रभान सखाराम कोळपे वय ३७ वर्षे, रा.पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर ३) सुरज दिगंबर जाधव वय ३६ वर्षे, रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर यांनी मयूरी दांगडे हिचा होणारा नवरा सागर कदम याला मारहाण केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तरी सदर गुन्हयाचा घटनाक्रम पाहता आरोपी नामे आदित्य दांगडे, मयुरी दांगडे, संदीप गावडे, शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे, सुरज जाधव यांनी कट रचून यातील फिर्यादी नामे सागर कदम यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने यवत पोलीस स्टेशन हदिदतील खामगाव फाटा येथे सोलापूर-पुणे हायवेवर अडवून लाकडी दांडक्याचे सहायाने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सदर गुन्हयात भा.न्या.सं. कलम १०९, ६१(२), १२६ (२) ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. तरी सदर गुन्हयातील महिला आरोपी नामे मयुरी दांगडे ही अदयाप फरार आहे. बाकी आरोपींना पोलीसांना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि महेश माने हे करीत आहेत.
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार :-मा.पंकज देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिराजदार सो. अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. बापुराव दडस सो. उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यवत पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे पोसई सलीम शेख, पोसई किशोर वागज, पोसई मारोती मेतलवाड, पो.हवा कर्चे, पो.हवा.गायकवाड, पो.हवा देवकर, पो.हवा काळे, पो.हवा चांदणे, पो.हवा यादव, पो.हवा कापरे, पो.कॉ बाराते, पो.कॉ गरूड, पो.कॉ भानवसे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष