महादेव मंदीरातील दान पेटीचे कुलुप तोडुन. दान पेटीतुन 9 हजार 131 रुपये चोरताना जागीच पकडले. दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,03-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०३ एप्रिल २०२५. दौंड रेल्वे स्टेशन जवळ शिशु विकास शाळे जवळ असलेल्या महादेव मंदीराचा दरवाजा उघडा पाहुण सदर महिलेने मंदीरात प्रवेश करून मंदीरातील दान पेटीचे कुलुप कशानेतरी तोडुन दान पेटीतुन एकुन 9 हजार 131 रुपये रोख रक्कम चोरुन घेवुन जात असताना तिला जागीच पकडले असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे.
हि घटना दौंड रेल्वे स्टेशन परिसरातील शिशु विकास शाळे जवळ असलेल्या महादेव मंदीरात दि 01/04/2025 रोजी दुपारी 02.30 वाजण्याचे सुमारास घडली असून या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे
फिर्यादी. करणसिंग मानसिंग नगरे वय 30 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा.गोपाळवाडी रोड माने हॉस्पीटल पाठीमागे दौंड, ता.दौड जि.पुणे. यांच्या तक्रारी वरून गुर.नं 260/2025 भारतीय न्याय. संहिता. कलम. 305, 324 (4) अंन्वये आरोपी सुवर्णा सतिवान जाधव वय 40 वर्षे रा.वडार गल्ली दौंड, ता.दौड जि.पुणे हीचे विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत -वर नमुद ता. वेळी व ठिकाणी वर नमुद आरोपी नामे शाळे जवळ असलेले महादेव मंदीराचे उघडे दरवाजा वाटे मंदीरात प्रवेश करुन मंदीरातील दान पेटीचे कुलुप कशानेतरी तोडुन नुकसान करुन दानपेटीतुन एकुन 9 हजार 131 रुपये किंमतीची रोख रक्कम चोरुन घेवुन जात असताना तिला जागीच पकडले असल्याने फिर्यादीची वरील महीले विरुद्ध कायदेशिर तक्रार असल्याचे नमूद करण्यात आले असुन दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पो हवा गायकवाड. पो हवा गायकवाड पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :