कासुर्डी ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सोपान काका गायकवाड यांची बहुमताने निवड.

By : Polticalface Team ,06-04-2025

कासुर्डी ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सोपान काका गायकवाड यांची बहुमताने निवड.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्ताने यात्रा समितीच्या अध्यक्षपदी श्री सोपान (काका) लक्ष्मण गायकवाड यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. आज दि ०६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजे सुमारास कासुर्डी गावातील विठ्ठल मंदिर या ठिकाणी भैरवनाथ यात्रा उत्सव समिती व समस्त ग्रामस्थांची मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या पूर्वीचे यात्रा कमिटी अध्यक्ष अशोकराव सोनवणे यांनी मागील वर्षाचा वार्षिक हिशोब सर्वांच्या समोर जाहीर मांडला. या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांमधून आरोप प्रती आरोप करत अनेक विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली नेहमीप्रमाणे यात्रा समितीमध्ये असलेल्या यादीतील २६ सदस्यांची नावे वाचण्यात आली. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये यात्रेची वर्गणी देणे बंधनकारक असल्याचे ठराव मंजूर करण्यात आला असून बहुमताने मान्यता देण्यात आली आहे. कासुर्डी येथे आज दुपारी साडेबारा वाजता रामनवमीचा कार्यक्रम संपल्या नंतर कासुर्डी येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष निवड करण्या बाबत चर्चा सुरू करण्यात आली त्यामध्ये सर्वानुमते कासुर्डी विविध कार्यकारी चे माजी चेअरमन विद्यमान संचालक सोपान उर्फ काकासाहेब लक्ष्मण गायकवाड यांची बिनविरोध यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून पुढील वर्षापर्यंत निवड करण्यात आली सोपान काका गायकवाड हे कासुर्डी गावातील सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामधलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व कासुर्डी विविध कार्यकारी च्या माध्यमातून गेले पंचवीस तीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि गावच्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्वाला आज खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे देवाची गावाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं निश्चितपणे केलं जाईल अशी प्रतिक्रिया सोपान काका गायकवाड यांनी व्यक्त केली. 

कासुर्डी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान यात्रा उत्सव सोमवार-मंगळवार दि २१ व २२ एप्रिल २०२५ रोजी होणार असुन हि परंपरा अनेक वर्षा पासून मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या वर्षी देखील यात्रा उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये अशी भुमिका सर्वांनी घ्यावी. दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य दौलत आण्णा ठोंबरे यांनी बोलताना सांगितले.

या वेळी कासुर्डी गावातील समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी माजी अध्यक्ष अशोक सोनवणे तसेच माजी सरपंच पांडुरंग बाजीराव आखाडे. ग्रामपंचायत विद्यमान माजी सदस्य. कासुर्डी गावचे ज्येष्ठ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच कासुर्डी गाव यात्रा कमिटीचे नवनिर्वांचित अध्यक्ष सोपान काका लक्ष्मण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टेकवडे. भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोपीनाथ मामा भोंडवे. कासुर्डी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन महेंद्र काका आखाडे. उद्योगपती विशाल शेठ टेकवडे. माजी चेअरमन राजाभाऊ आखाडे. पैलवान वाल्मीक आखाडे. दौंड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य दौलत आण्णा ठोंबरे. कासुर्डी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिलीपराव आखाडे. कासुर्डी वि का सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव सोनवणे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व हभप हिम्मतराव गायकवाड. हभप माणिक आबा गायकवाड. माजी संचालक रमेश नाना गायकवाड. हभप गणेश आखाडे महाराज युवा कार्यकर्ते पोपटराव गायकवाड आदी कासुर्डी येथील आजी-माजी समस्त ग्रामस्थ पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हसत खेळत ही बैठक पार पडली असुन या वेळी बहुसंख्येने समस्त ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.