क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने. दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग संपन्न. (बेकायदा अवैध धंदे बंद करा)
By : Polticalface Team ,11-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १० एप्रिल २०२५ रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे सायंकाळी सहा वाजता दौंड पोलीस प्रशासनाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने सार्वजनिक स्थानिक शांतता कमिटी मीटिंगचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
मा.श्री बापूराव दडस,उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
सदर मीटिंग मध्ये मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांनी दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी प्रत्येक नागरिकांना व मंडळाच्या पदाधिकारी यांना वाहतुक, मिरवणूक, बॅनर व वाद्य बाबत सूचना दिल्या आहेत. तसेच सदर मिरवणुकी मध्ये व जयंती उत्सवामध्ये लहान मुले, मुली व महिला यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाने स्वतः जबाबदारी घेऊन इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. महिला व मुली यांच्या विषयी अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे
पोलीस निरीक्षक श्री गोपाळ पवार यांनी उपस्थित भीम अनुयाया यांच्याशी संवाद साधला. पुढे बोलताना
ते म्हणाले जयंती उत्सव निमित्त प्रत्येक नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार आत्मसात करून आचरणात आनावा त्याचे पालन करावे. हा जयंती उत्सव शांततेत पार पाडने ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असुन जयंती उत्सव साजरा करावा असे त्यांनी बोलताना सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले यापूर्वी जयंती उत्सवा मध्ये ज्या इसमान विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशा इसमान वरती हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(पोलीस विभागाच्या मार्फतीने दौंड पोलीस स्टेशन येथे सर्व नागरिकांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी वाचन केंद्र विशेष उपक्रम ठेवण्यात येणार आहे. दौंड शहरातील युवा तरुण महिला व मुलींनी वाचनामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच दौंड तालुका ग्रामीण व शहरातील बेकायदेशीर असलेल्या अवैध धंदे तत्काळ बंद करा अन्यथा चालक-मालक यांच्या विरुद्ध धडक कारवाई केली जाईल या मोहिमे बाबत विशेष पोलीस पथकांची टिम नेमण्यात येणार असल्याचे मा.श्री बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष