खामगावात येथील सार्वजनिक मंदिरामध्ये विठ्ठल रूखमिनी व संत सावता महाराज याच्या मुर्तीची स्थापना.
By : Polticalface Team ,22-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २१ एप्रिल २०२५ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव जगता मळा या ठिकाणी दि २१ /०४/२०२५ रोजी विठ्ठल रूखमिनी व संत सावता महाराज याच्या मुर्तीची स्थापना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्सवात आयोजन करण्यात आले होते.
खामगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील सार्वजनिक मंदिरामध्ये विठ्ठल रूखमिनी व संत सावता महाराज याच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन गावातील स्थानिक राम तरूण मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती खामगाव ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच प्रदिप एकनाथ जगताप यांनी दिली
खामगाव येथे आदल्या दिवशी मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या धुमधडाक्यात गाडमोडी चौक ते मंदीरा पर्यंत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी पुजा पाठ धार्मिक विधी होमहवन करुन मुर्तीची स्थापना करण्यात आली तसेच गावातील सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
खामगाव येथील भजनी मंडळे यांनी हरिपाठ घेतल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. हभप वागले महाराज यांनी वारकरी सांप्रदायिक किर्तन केले. त्यांच्या मधुर वाणीने संतांचा महिमा उपस्थित भाविक भक्तांना तृप्त केले. खामगाव पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती रात्री बराच वेळ भजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने परीसरातील अनेक मान्यवरानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये प्रामुख्याने दौंड तालुक्याचे माजी आमदार रंजना ताई कुल. खामगाव पोलीस पाटील सुचिता जगताप मा उपसरपंच सुखदेव चोरमले खामगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अतुल जगताप राजेद्र जगताप गोपीनाथ टिळेकर विकास कुल नीतीन कुदळे अदी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती तसेच गावातील युवा तरुण जेष्ठ नागरिक महिलांची संख्या अधिक प्रमाणात दिसून आली सपुर्ण परिसरात एकच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाचक क्रमांक :