लिंगाळी ग्रामपंचायती मधील भ्रष्टचाराची चौकशी करा ? आंदोलन तात्पुरते स्थगित. कामे न झाल्यास. तीव्र आंदोलन केली जाईल. नरेश डाळिंबे यांचा इशारा
By : Polticalface Team ,24-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ एप्रिल २०२५ दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी ग्रामपंचायत ता दौंड जिल्हा पुणे येथील तसेच लिंगाळी मसनरवाडी माळवाडी मेरगळवाडी या गावांमध्ये ६ कोटी रुपयांची भारत सरकारची जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन गेली ४ ते ५ वर्षे झाली असून. सदर योजनेचे अर्धवट काम करून ठेकेदारांना कामाची रक्कम अदा करण्यात आलेल्या आहेत. सदर योजना कार्यान्वीत न झाल्याने या गावांमध्ये पाण्याची अत्यंत बिकट परस्थिती निर्माण झाली आहे. सदर योजने मध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता
नाकारता येत नाही. सदर भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. लिंगाळी गावचे माजी सरपंच नरेश डाळिंब यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती, अनुसूचित जाती-जमाती वस्तीच्या विकासाची कामे सदर वस्तीत न करता इतर ठिकाणी करण्यात आली आहेत. या बाबत देखील चौकशी करण्यात यावी.
शाहु नगर (जगदाळे वस्ती), पासलकर नगर, बालाजी नगर, वेताळ नगर या परिसरात दलित व बौध्द जनसंख्या जास्त प्रमाणात असल्याने जातीय द्वेष भावनेतून लिंगाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल जगदाळे यांनी पिण्याच्या पाण्या पासून नागरिकांना वंचित ठेवले आहे. त्या बद्दल त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले असून
इतर मागण्यांकरिता लिंगाळी गावचे माजी सरपंच नरेश डाळिंब यांनी विविध संबंधित शासकीय कार्यालय अधिकारी यांना निवेदनाद्वारे धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या नुसार बुधवार दि.२३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता दौंड तहसिल कार्यालया समोर बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन दौंड तहसील कार्यालय समोर सुरू असलेल्या धरणे आंदोलन या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद पुणे विभाग उपअभियंता निहा ढाके मॅडम यांनी भेट दिली.
या वेळी संबंधित आंदोलन कर्त्यांच्या मागणी बाबत चर्चा करून सदर प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याने हे आंदोलन काही दिवसासाठी स्थगित करीत असून काही दिवसात लिंगाळी ग्रामपंचायत च्या वरिल भागात जल जीवन मशीन पाणी पुरवठा योजना सुरु न झाल्यास व बालाजी नगर पासलकर वस्ती शाहु नगर मधिल पाणी पुरवठा योजनेच्या त्रूटी दुर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लिंगाळी गावचे माजी सरपंच नरेश डांळीबे विकास कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलताना सांगितले लिंगाळी ग्रामपंचायती मधील भ्रष्टचाराची चौकशी करा ? अन्यथा तीव्र आंदोलन केली जाईल असा इशारा नरेश डाळिंबे यांनी दिला आहे.
या वेळी उपविभाग ग्रामपंचायत पाणी पुरवठा दौंड पंचायत समिती, सरपंच सुनिल जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य व सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश जगदाळे, ॲड संदिप येडे. आबा जगताप नागेश साळवे दिपक सोनवणे सिद्धार्थ माशाळ नवनाथ गायकवाड सोमा गायकवाड भारत सरोदे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलन काही दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे.पुढील काही दिवसात लिंगाळी ग्रामपंचायत च्या वरिल भागात जल जीवन मशीन पाणी पुरवठा योजना सुरु न झाल्यास व बालाजी नगर पासलकर वस्ती शाहु नगर मधिल पाणी पुरवठा योजनेच्या त्रूटी दुर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लिंगाळी गावचे माजी सरपंच नरेश डांळीबे विकास कदम यांनी केला आहे.
वाचक क्रमांक :