संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत पात्र लाभार्थीनी आधार कार्ड व्हेरिफिकेशन करुन घ्यावे. दौंड तहसीलदार अरुण शेलार यांचे आव्हान.
By : Polticalface Team ,27-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २७ एप्रिल २०२५ दौंड तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थीनी स्वाताचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करुन घ्यावे असे आवाहन दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक विसयो २०२४/प्र.क्र.०४/विसयो. मंत्रालय,मुंबई ४०००३२,
दिनांक १९ डिसेंबर २०२४ चे शासन निर्णया नुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राज्यात राबविण्यात येत आहेत.
माहे डिसेंबर २०२४ पासुन वरील योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT (DIRECT BENEFIT TRANSFER) पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार पात्र लाभार्थ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा होत आहे.
दौंड तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे एकुण ६५०६ लाभार्थी पोर्टलवर नोंदविण्यात आलेले असुन त्या पैकी ४५९२ लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पुर्ण झालेले आहे व १९१४ लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे. शासन निर्णया नुसार लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन केल्या शिवाय त्यांचे बैंक खात्यात अनुदान जमा होणार नाही. त्यासाठी दौंड तहसिल कार्यालय स्तरावरुन तसेच ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत लाभार्थ्यांना आधार कार्ड व्हेरिफिकेशन करुन घेणे बाबत वेळोवेळी आव्हान करण्यात आले होते.
मात्र काही लाभार्थीचे अद्याप आधार कार्ड व्हेरिफिकेशन केले नाही अशा लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करुन दौंड तहसिल कार्यालय संजय गांधी शाखा विभाग येथे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करुन घ्यावे. किंवा स्थानिक मंडळ स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे, त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करुन घ्यावे. अशी माहिती दौंड तहसीलदार मा अरुण शेलार यांनी दिली. ते बोलताना म्हणाले संजय गांधी निराधार योजने अंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी तत्काळ आधार कार्ड व्हेरिफिकेशन करुन घेणे आवश्यक आहे. दौंड तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना पात्र लाभार्थीना आवाहन करण्यात आले आहे
वाचक क्रमांक :