कुरकुंभ येथे कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या सह लोकांन विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड पोलीसांनी केली कारवाई
By : Polticalface Team ,02-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 02 मे 2025 दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कुरकुंभ गावच्या हद्दीत सोलापुर पुणे हायवे सर्व्हिस रोडचे कडेला पत्रा शेडचे आडोशास कल्याण मटका नावाचा जुगार चालवित असलेल्या सहा लोकांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस स्टेशन येथे दि 01मे 2025 रोजी फिर्यादी संजय धनिराम नगरे पोलीस हवालदार नेमणुक दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या फिर्यादी वरून सदर आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गु.रजि नं 315--316/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यामध्ये असलेल्या आरोपींची नावे. 1) अक्षय संजय खंडागळे वय 34 वर्षे रा मोरे वस्ती कुरकुंभ ता दौंड जि पुणे 2) गणेश बाजीराव जाधव वय 44 वर्षे रा सिताराम मळा लोणी काळभोर ता हवेली जि पुणे 3) भाऊ बाबुराव कोळपे वय 53 वर्षे रा पाटस कोळपे वस्ती ता दौंड जि पुणे हे आपले ताब्यात 2615 रूपये किंमतीचे कल्याण मटका नावाचे जुगाराचे साधने व रोख रक्कम जवळ बाळगुन जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असताना मिळुन आले आहेत.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कुरकुंभ येथे कल्याण मटका नावाचा जुगार खेळण्याचे साहीत्य रोख रक्कम असा माल मिळुन आला दि 01/05/2025 रोजी 19.30 वा.चे सुमारास मौजे कुरकुंभ गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे सर्व्हिस रोडचे कडेला पत्राचे शेडचे आडोशास इसम 1) अक्षय संजय खंडागळे वय 34 वर्षे रा मोरेवस्ती कुरकुंभ ता दौंड जि पुणे 2) गणेश बाजीराव जाधव वय 44 वर्षे रा सिताराममळा, लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे 3) भाऊ बाबुराव कोळपे वय 53 वर्षे रा पाटस कोळपे वस्ती ता दौंड जि पुणे हे आपले ताब्यात 2615 रूपये किंमतीचे कल्याण मटका नावाचे जुगाराचे साधने व रोख रक्कम जवळ बाळगुन जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असताना मिळुन आले आहेत.
तसेच गुन्हा र नं 316 मध्ये 2135.येणे प्रमाणे परील वर्णनाचा व किंमतीया कल्याण मटका नावाचा जुगार खेळण्याचे साहीत्य रोख रक्कम असा माल मिळुन आला दि 01/05/2025 रोजी 20.00 वा.चे सुमारास मौजे कुरकुंभ गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे सर्व्हिस रोडचे कडेला पत्राचे शेडचे आडोशास आरोपी 1) अशोक सर्जेराव चव्हाण तय 60 वर्षे रा भिमनगर दौड ता दौंड लि पुणे 2) ओंकार गौतम कुलावळे वय 24 वर्षे भिमनगर दौंड ता दौंड जि पुणे 3) बिरूदेव महादेव बिटे वय 40 वर्षे रा पाटस ता दौंड जि पुणे हे आपले ताब्यात 2135 किंमतीचे कल्याण मटका नावाचे जुगाराचे साधने व रोख रक्कम जवळ बाळगुन जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असताना मिळुन आले आहेत त्याचे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे सरकार तर्फे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद असुन दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल -सपोफौ श्रीरंग शिंदे. सपोफौ वाघमारे पो हवा पठाण पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :