बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना.
By : Polticalface Team ,06-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०६ मे २०२५ दौंड तालुक्यातील मौजे राहु ता दौंड जिल्हा पुणे येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील १७ वर्षाच्या हर्षदा बबन पवार या विद्यार्थिनींला बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून या विद्यार्थिनीने. राहू (ता.दौंड) येथील राहत्या घरामध्ये साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ही घटना दि ०५/०५/२०२५ रोजी दु ०२.३० वाजे सुमारास घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
सदर घटने बाबत यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी बबन महादेव पवार वय ३५ वर्षे व्यवसाय शेती रा राहु सोनवणे मळा ता.दौंड जि.पुणे यांच्या फिर्यादी वरून म.र.नं. १००/२०२५ BNS १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे.
हर्षदा ही हुशार मुलगी होती ती पुणे येथे शिक्षण घेत होती.इयत्ता दहावीला तिला ८७ टक्के गुण होते. बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून तिला ५५ टक्के गुण मिळाल्यामुळे ती नाराज होती.
तिचे आई वडील राहू परीसरात मोलमजुरी करतात. ते कामा निमित्त बाहेर गेले होते. तर आजी आजोबा हे परगावी पाहुण्याकडे गेले होते. दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाल्या नंतर तिला या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असल्यामुळे तिने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या वेळी तिचा लहान भाऊ घराच्या बाहेर होता दुपारी वडील घरी आल्या नंतर ही हर्षदा बराच वेळ दार उघडत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनीं खिडकीतून पाहिले असता धक्काच बसला.
हर्षदाने घराचे छताचे लोखंडी चॅनलला साडीचे साहाय्याने गळफास घेतला हे पाहताच तत्काळ दरवाजा तोडला आणि समोरील दृश्य पाहून टाहो फोडला सिनर्जी हॉस्पीटल राहू ता दौंड येथे घेवून गेले तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासून पाहिले असता हर्षदा मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नुकतेच जाहीर झाले असलेल्या बारावीचे निकालामध्ये हर्षदाला
गुण कमी पडले म्हणून काय झालं ? कोणी असं करतं का ?
अपयशाने खचून न जाता भविष्यातील अनेक उज्वल संधीकडे सर्व विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे
वाचक क्रमांक :