By : Polticalface Team ,07-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०७ मे २०२५ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेल्या श्री सुनील बगाडे यांनी जबाबदारीने आपल्या कर्तव्याची जाणीव करून यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्यांची पोलीस खात्यामध्ये त्यांची सन १९ ९१ मध्ये पोलीस खात्यामध्ये नेमणुक झाल्या पासून त्यांनी शिरुर पोलीस स्टेशन. इंदापूर पोलीस स्टेशन. दौंड पोलीस स्टेशन. आणि यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी जबाबदारीने कर्तव्याचे पालन केले आहे.
यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार गोविंद ज्ञानदेव भोसले यांचे १९९३ साली पोलीस खात्यामध्ये नेमणुक झाल्या पासून त्यांनी मंत्रालय सुरक्षा मुंबई दौंड पोलीस स्टेशन लोणी काळभोर पोलीस स्टेशन बारामती शहर पोलीस स्टेशन जेजुरी पोलीस स्टेशन
आणि यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी जबाबदारीने कर्तव्याचे पालन केले आहे.
यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खाते अंतर्गत असलेल्या गुन्हे निहाय संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मा नारायण देशमुख साहेब यांनी दिलेली जबाबदारी सुनिल बगाडे व गोविंद भोसले यांनी साहाय्यक फौजदार पदी असताना चोख पार पाडली आहे. या कार्याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन श्री सुनील बगाडे व गोविंद भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली असल्याची प्रतिक्रिया बगाडे व भोसले यांनी बोलताना सांगितले.
शिरुर.इंदापूर.दौंड.लोणी काळभोर. बारामती.जेजुरी.आणि यवत पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मित्र परिवार यांच्याकडून सुनिल बगडे व गोविंद भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात आल्या आहेत. यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी श्री सुनील बगाडे व श्री गोविंद भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या हस्ते सुनिल बगाडे यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक महेश माने. पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या प्रसंगी यवत पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी तसेच पोलीस मित्र रमेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या
यवत गावातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी देखील नवनिर्वांची पोलीस उपअधीक्षक श्री सुनील बगाडे व श्री गोविंद भोसले यांना पुढील प्रशासकीय कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर. यवत ग्रामपंचायतीचे मा उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे पाटील. सामाजिक कार्यकर्ते सुरज चोरगे दिपक दोरगे. सतिश सावंत सर गणेश खळदकर डॉ संतोष बडेकर. अनिल गायकवाड. जेष्ठ पत्रकार दशरथ यादव. संजय सोनवणे. दिपक पवार. बाळासाहेब मुळीक यांनी यवत पोलीस उपनिरीक्षक श्री सुनिल बगाडे यांची समक्ष भेट घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :