खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

By : Polticalface Team ,14-05-2025

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पुणे विभागाच्या एसएससी बोर्डामार्फत मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 90% च्या जे गुण प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांना श्री व्यंकनाथ विद्यालयाचे स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराव काकडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी प्रत्येकी 1100 रुपये घोषित करण्यात आले होते. त्या गुणवंत विद्यार्थ्यांना श्री काकडे यांनी विद्यालयात शानदार सोहळ्यामध्ये सन्मान करून बक्षिसाचे वितरण करण्यात आले. दरम्यान स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराव काकडे हे विद्यार्थी प्रिय आहेत. ते नेहमीच गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना कोणताही उपक्रम असो अगर शासकीय परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळवले. त्या विद्यार्थ्यांना विद्यालयात येऊन बक्षीस रूपाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. त्यांमध्ये श्री काकडे यांनी एसएससी परीक्षेत कितीही विद्यार्थी 90% च्या पुढे गुणवत्तेत विद्यार्थी चमकले. तर त्यांना प्रत्येकी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल वाढवतात. हा निश्चित खंडेराव काकडे यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्यामध्ये मार्च 2025 मध्ये श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या चार विद्यार्थिनी प्रामुख्याने सोनल शिंदे; सुप्रिया वडवकर; स्नेहा डांगे; तेजस वागस्कर या चार विद्यार्थ्यांनी गुणांनुक्रमाने 90% च्या पुढे उत्कृष्ट गुण मिळवले. त्यांचा विद्यालयात स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराव काकडे यांनी घोषित केलेल्या बक्षिसाचे स्कूल कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रत्येकी अकराशे रुपये प्रमाणे एकूण चार हजार चारशे रुपये बक्षीसाचे वितरण करण्यात आले. व गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे; माजी संचालक विलासराव काकडे; स्कूल कमिटीचे सदस्य पुरुषोत्तम लगड; खंडेराव काकडे; अकबरभाई इनामदार; संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात; माजी प्राचार्य रंगनाथ राजापुरे सर; माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे सर; रयतेचे माजी प्राचार्य एम आर पवार सर; सेवानिवृत्त शिक्षक एन टी शेलार सर; उपसरपंच हनुमंत मगर; ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे; राहुल गोरखे; दिगंबर साळवे; विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे सर; यांच्यासह प्रा निसार शेख; शिक्षक संतोष शिंदे; मनोज कांबळे; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; एकनाथ नेटवटे; राहुल येरकळ आदिसह गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन