निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा
By : Polticalface Team ,15-05-2025
जनआधार न्युज भिमसेन जाधव मो. 9112131616 बारामती ( निरावागच) बारामती तालुक्यातील निरावागज या गावी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकाचे विटंबना झाल्याच्या निषेधार्थ बुधवार 14 मे रोजी निरावागज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकञ येत निषेध सभा आयोजित केली. ज्यामध्ये तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. या निषेध सभेत वंचित बहुज युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी या घ् णास्पद कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्रारे केली. निकाळजे यांना पोलीस प्रशासनाला तात्काळ या प्रकरणाची गंभीयाने दखल घेऊन दोषीना शोधून काढण्याचे आणि आमच्यावर कुठे कारवाई करण्याचे आवाहन केले. या निषेध सभेत सामाजिक कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी या विटंबनेच्या घटनेबदृल तीव्र नाराजी व्यक्त केली. उपस्थितानी एकमुखाने या समाजकंटकाच्या कृत्याचा निषेध केला आणि गावात शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले. गावातील नागरिकांना स्वयंस्फतीने बंद पाळल्यामुळे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला होता. या घटने मुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे पोलीस प्रशासनाने या घटनेची नोंद घेऊन पोलीस पुढील तपास करत आहे *रोज पहा जनआधार न्युज*
वाचक क्रमांक :