अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

By : Polticalface Team ,26-05-2025

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता 26 मे 2025 पुणे जिल्हा व दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ग्रामीण भागासह दौंड शहरात सलग दोन चार दिवस सतत पाऊस पडत असल्याने दि 26/05/2025 रोजी सकाळी 11.00 वा चे सुमारास दौंड शहरातील आहीर गुरूजी भवन जैन मंदिरा शेजारी शिवाजी चौक ता दौड जि पुणे येथील वैष्णवी फ्लॉवर मार्ट येथिल दुमजली असलेले राहते घराची भिंत ही दुकानाचे पत्र्या शेडवर पडून दुर्घटना घडली यामध्ये मयत नामे ताराबाई विश्वचंद्र आहीर वय 75 वर्षे रा आहीर गुरुजी भवन जैन मंदिरा शेजारी शिवाजी चौक ता दौड जि पुणे यांच्या अंगावर भिंत पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे खबर देणारे मंगलकुमार चंद्रशेखर आहीर वय 48 वर्षे व्यवसाय टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स रा आहीर गुरुजी भवन जैन मंदिरा शेजारी शिवाजी चौक ता दौंड जि पुणे यांच्या खबरी वरून दौंड पोलीस ठाण्यात अपमृत्यु क.68/2025 भारतीय नागरी, सुरक्षा संहिता 194 प्रमाणे दौंड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली या बाबत अधिक माहिती अशी की दि 26/05/2025 रोजी सकाळी 11.00 वा चे सुमारास ताराबाई विश्वचंद्र आहीर या वैष्णवी फ्लॉवर मार्ट येथिल दुकानात बसलेल्या असताना राहते घराची भिंत ही दुकानाचे पत्र्या शेडवर पडून मयत ताराबाई विश्वचंद्र आहीर त्याचे अंगावर पडली असे मला माझा मुलगा कृष्णा यांने कळवले मी तत्काळ घटनास्थळी पोहोचलो माझे स्थानिक मित्र असे सर्वांनी मिळून त्यांना रिक्षाने आनंद हॉस्पीटल दौंड येथे नेले तेथिल डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार भोसले यांनी दौंड पोलीस ठाण्यात अपमृत्यु क.68/2025 भारतीय नागरी, सुरक्षा संहिता 194 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार घाडगे पुढील तपास करीत आहेत. 


 दौंड तालुक्याचे आमदार ॲड राहूल कुल यांनी दौंड तालुक्यातील अवकाळी व अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हीसी द्वारे आढावा घेण्यात आला होता. या मध्ये तालुक्यातील १) नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे२) बंद रस्त्यांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त देणे३) ⁠कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जिवीत हानी होऊ नये या करिता सर्वांनी अलर्ट मोडवर राहण्या बाबत निर्देश दिले होते तसेच नागरिकाच्या मदतीसाठी बारामती येथील NDRF ची टीम मुक्कामी असल्याचे दौंड प्रशासनाने सांगितले होते. कुठं गेली मुक्कामी असलेली आपात कालीन फौज यांनी सुरक्षा का दिली नाही ? दौंड शहरात उपाय योजना का? केली नाही.दौंड शहरातील नागरिकांचा सवाल ? जेष्ठ नागरिक ताराबाई विश्वचंद्र आहीर यांच्या आपत्कालीन मृत्यूला नेमके जबाबदार कोण ? दौंड शहराला वाली नाही काय ? अपात कालीन अवस्था आसताना दौंड नगरपालिकेला मुख्याधिकारी का ? नाही दौंड नगरपालिका कर्मचारी वसाहत जीर्ण झालेली एक इमारत पाडण्यात आली मात्र ती पुन्हा बांधण्यात आली नाही.? दौंड शहरातील जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत परंतु त्या पाडल्या जात नाहीत ? दौंड नगरपालिका प्रशासन अजून किती जीव गेल्यावर नागरिकांच्या सुरक्षेते बाबत भुमिका घेतली जाईल ? याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.


 अवकाळी पावसाने शेतकरी नागरिकांच्या नाकी नऊ आले असून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती होईल या बाबत प्रशासनाने सावध भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.