यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

By : Polticalface Team ,26-05-2025

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २४ मे २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता. दौंड जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजुने असलेले लोखंडी ब्रॅकेट ओलांडून जेष्ठ नागरिक व महिला वर्ग अनेक वर्षांपासून जीव धोक्यात घालून प्रवास करत होते यवत येथील भुयारी मार्ग हा चुकीच्या ठिकाणी करण्यात आला असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हायवे महामार्ग प्रशासनाच्या चुकिच्या धोरणामुळे यवत पंचक्रोशीतील नागरिकांना ना हक त्रास सहन करावा लागत आहे महामार्गावरील लोखंडी ब्रॅकेट ओलांडून प्रवास करत असताना अपघात होऊन अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत यवत गावातील हायवे महामार्गाच्या लगत असलेल्या ड्रेनिज लाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने पावसाचे पाणी ड्रेनेज मध्ये न जाता सेवा मार्गावरून वाहत आहे. त्यामुळे समस्त ग्रामस्थ नागरिकांना या बाबत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे काही दिवसात आषाढी एकादशी पंढरपूर पाई वारी देहू ते पंढरपूर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे सोलापूर हायवे महामार्गाने मार्गस्थ होणार असुन यवत या ठिकाणी पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी मुक्कामी असतात महामार्गाच्या दोन्ही बाजूला स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने राहतात शिवाय पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांना लोखंडी ब्रॅकेट चा ना हक त्रास सहन करावा लागणार आहे तसेच पाटस टोल प्रशासनाने यवत येथील सेवा महामार्गाच्या लगत असलेल्या एक बाजुच्या ड्रेनिज लाईन दुरुस्तीचे काम केले आहे मात्र दुसऱ्या बाजूचे ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम अध्यापही करण्यात आले नाही. अवकाळी पावसाने सेवा मार्गावर झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पुणे सोलापूर हायवे महामार्ग हा यवत गावच्या मधुन जात असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाव विभागले आहे यवत गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे हायवे मार्गाच्या दोन्ही बाजुने नागरी लोकवस्ती अधिक प्रमाणात आहे तसेच यवत पंचक्रोशीतील नागरिकांची गावांमध्ये वर्दळ दिसून येते पुणे सोलापूर बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना महामार्गा लगत असलेल्या लोखंडी जाळी ब्रॅकेट ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यवत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोर असलेल्या एकच अरुंद भुयारी मार्ग असल्याने नागरीकांना दुरवरुन चालत वळसा घालुन प्रवास करावा लागत आहे वास्तविक पाहता हा भुयारी मार्ग यवत गावच्या मुख्य चौकात होणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही यवत येथील समस्त ग्रामस्थ नागरिकांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राज्य महामार्ग प्रशासनाने यवत येथील हायवे महामार्गाच्या मध्य ठिकाणी डिव्हायडर वर लोखंडी जाळी ब्रॅकेट लावल्या आहेत. त्यामुळे ‌यवत पंचक्रोशीतील नागरिकांची गैरसोय झाली आहे. यवत गावांमध्ये सेवा मार्गाने महामंडळाची लाल परी एसटी बस गाड्या धावत नाहीत. पुणे सोलापूर बाजूकडे प्रवास करण्यासाठी हायवे रोडच्या बाजूला असलेले लोखंडी ब्रॅकेट ओलांडून जेष्ठ नागरिक व महिला नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे महामंडळाच्या लाल परी एसटी बससाठी दुरवरुन वळसा घालून परत मुख्य चौकात ताटकळत उभे राहवे लागत आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने या बाबत तत्काळ दखल घेऊन पुणे सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या एसटी बस गाड्या यवत या ठिकाणी सेवा मार्गाने जाण्यास एसटी चालकास सुचना देण्यात यावी अशी स्थानिक नागरीकांनकडून एसटी महामंडळ प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. यवत येथील मुख्य चौकापासून लांब असलेला भुयारी मार्ग हा चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आला असल्याने अनेक नागरिकांच्या जीवाशी बेतला आहे जवळचा प्रवास करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे त्यामुळे हायवे महामार्ग प्रशासनाने यवत येथे पुणे सोलापूर हायवे मार्गावर दोन्ही बाजूला व मध्ये ठिकाणी लोखंडी ब्रॅकेट लावले आहेत तरी देखील काही लोक उड्या मारुन प्रवास करण्याचा प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे हे नाकारता येणार नाही. परंतु नागरिकांना सोयिस्कर पडेल असा जवळचा मार्ग सुरू करण्यात यावा. यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या पुणे सोलापूर हायवे महामार्ग पुला खालून पायदळ वाट सुरु करण्यात यावी अशी यवत नागरिकांकडून मागणी केली जात आहे. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव तसेच यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यांनी नागरिकांच्या मागणी नुसार दखल घेऊन हायवे महामार्ग प्रशासनाकडे तत्काळ पाठपुरावा करून यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या पुला खालून पायदळ प्रवास वाट सुरु करण्यात यावी अशी मागणी यवत नागरिकांकडून केली जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.