खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,05-06-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 04 जुन 2025 दौंड तालुक्यातील मौजे खडकी ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीतील सोलापुर पुणे हायवे रोडवर मध्ये भागी उभा राहुन एसटी बसला दगड मारून चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी. एसटी बस चालक यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी 1) प्रविन काळे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे व इतर 6 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक 03/06/2025 रोजी दुपारी 4.50 वा चे सुमारास मौजे खडकी गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवर बस स्टॉप जवळ घडली आहे
या बाबत अधिक माहिती अशी की (एसटी बस चालक) फिर्यादी ज्ञानोबा मुजाजी वाघमारे वय 34 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर (बॅच नं.26495) रा. मु. बामनी पोस्ट गलसांघवी ता.कंधार जि.नांदेड याचे तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि नं 398/2025 भा.न्या.संहिता कलम 189(2) 191(2) 190 132 115(2) 351(2) 352 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दिनांक 03/06/2025 रोजी दुपारी 4.50 वा चे सुमारास मौजे खडकी गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवर बस स्टॉप जवळ ता.दौंड जि.पुणे येथे गर्दी जमवून त्यातील आरोपी 1) प्रविन काळे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे ह्याने रोडच्या मध्ये भागी उभा राहुन एस.टी बसला दगड मारला व चालकास शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्ही खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का ?थांबवत नाही. असे म्हणुन आरोपींनी एसटी बस वाहक गोविंद चंद्रपालसिंह गहेरवाल यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करून एस.टी बसचे नुकसान केले असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार- पोलीस हवालदार सय्यद सहायक पोलिस फौजदार मलगुडे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :