यवत गावातील जेष्ठ नागरिक प्रथमच घेणार खळखळून पोटभरुन हसण्याचा आनंद. (हास्य आनंदाची लयलुट) एकपात्री विनोदी कार्यक्रम
By : Polticalface Team ,13-06-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १२ जून २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत यवत यांच्या सौजन्याने श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरीक सेवा संघ यवत यांच्या वतीने आयोजित (हास्य आनंदाची लयलुट) एकपात्री विनोदी कार्यक्रम खळखळून पोटभरुन हसा. यवत पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिकांनी आयुष्यभर कष्ट करुन आपले जीवन आयुष्य वृद्ध काळापर्यंत खर्ची घातले आहे या थकलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी २ तास पोटभरुन हसण्याचा कार्यक्रम रविवार दि.१५/०६/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. आनंदाची लयलुट हा एकपात्री विनोदी हास्याचा कार्यक्रम सकाळी ११ ते १२:३० या वेळेत यवत येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळ बाजार मैदान यवत.या ठिकाणी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष मा.श्री.समीर नाना दोरगे (प्रथम नागरीक सरपंच यवत) मा.श्री.सुभाष बाप्पु यादव (द्वितीय नागरीक उपसरपंच यवत प्रमुख उपस्थिती सर्व आजि-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी सोसायटी चेअरमन व सदस्य सेवानिवृत्त कामगार व गावातील सर्व समस्त ग्रामस्थ सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
आयोजक अध्यक्ष श्री.जनार्दन (दादा) चांदगुडे सचिव श्री. रमेश (आण्णा) यादव सर्व संचालक मंडळ व ज्येष्ठ नागरीक / समस्त ग्रामस्थ यवत श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरीक सेवा संघ यवत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालक श्री.डॉ.श्याम कुलकर्णी (अध्यक्ष आनंद फाऊंडेशन) कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरीक संघ यवत ता दौंड जिल्हा पुणे हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले
आनंदाची लयलुट हा एकपात्री विनोदी हास्याचा कार्यक्रम
सादरकर्ते - विनोदाचा बादशहा मा.श्री.प्रा.मारुतीराव यादव सर (सावित्रीबाई फुले विद्यापिठ, पुणे)
रविवार दि १५/०६/२०२५ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत मध्ये सर्व जेष्ठ नागरीकांसाठी सरकारी योजनांन बाबत माहिती दिली जाणार असून या बाबत काय फायदे आहेत केंद्र सरकारने नागरिकांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना. आरोग्य सुविधा आदी आवश्यक विविध दाखले अशा अनेक विषयांवर यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मा.श्री.बालाजी सरवदे हे
मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले
यवत पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिकांनी आनंदाची लयलुट या एकपात्री विनोदी हास्याचा कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आवश्य आहे याल तर हसाल न याल तर फसाल. परत तक्रार करु नका, आम्हाल बोलावले नाही म्हणुन लवकर येऊन आपली जागा धरा, कार्यक्रम अतिशय सुंदर असल्यामुळे गावातील सर्व नागरिक युवा तरुण तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
वाचक क्रमांक :