संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

By : Polticalface Team ,21-06-2025

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २१ जून २०२५ दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवासी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून सुरळीत करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी वारी पुणे सोलापूर महामार्गाने वाटचाल करीत आहे दि.२३/०६/२०२५ रोजी कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे येथे पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत आगमन होत असुन दि.२३/०६/२०२५ रोजी यवत ता.दौंड जि.पुणे या ठिकाणी पालखी मुक्काम तसेच दि.२४/०६/२०२५ रोजी वरवंड ता.दौंड जि.पुणे या ठिकाणी पालखी मुक्काम व दि.२५/०६/२०२५ रोजी उंडवडी ता.बारामती जि.पुणे या ठिकाणी पालखी मुक्काम होत असुन पुढे बारामती सणसर निमगाव केतकी इंदापुर दि.३०/०६/२०२५ रोजी पर्यंत मुक्काम असुन दि.०१/०७/२०२५ रोजी सकाळी ८ वाजे सुमारास सराटी ता.इंदापुर जि.पुणे येथुन सोलापुर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारी दरम्यान मा.जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेशा नुसार पुणे सोलापूर या मार्गावरील प्रवासी वाहतूक वळविण्यात आली आहे. १) दि.२३/०६/२०२५ रोजी पहाटे ०२ ते रात्री २४.०० वाजे पर्यंत सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक केडगाव चौफुला पारगाव राहु केसनंद वाघोली अशी वळविण्यात आली आहे. तसेच पुणे बाजुकडुन सोलापुर करीता जाणारी वाहने वाघोली केसनंद राहु पारगाव केडगाव चौफुला मार्गे सोलापुर अशी वळविण्यात आली आहे. २) दि.२४/०६/२०२५ रोजी पहाटे ०२ वाजे ते रात्रौ २३.०० वाजे पर्यंत सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक कुरकुंभ दौंड काष्टी न्हावरा पारगाव राहु वाघोली पुणे अशी वळविण्यात आली आहे. तसेच पुणे बाजुकडुन सोलापुर करीता जाणारी वाहने थेऊर फाटा केसनंद राहु पारगाव न्हावरा काष्टी दौंड कुरकुंभ मार्गे सोलापुर अशी वळविण्यात आली आहे. ३) दि.२५/०६/२०२५ रोजी पहाटे ०२ ते सायंकाळी १८ वाजे पर्यंत सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक कुरकुंभ दौंड काष्टी न्हावरा केडगाव चौफुला पुणे अशी वळविण्यात आली आहे. तसेच पुणे बाजुकडुन सोलापुर करीता जाणारी वाहने केडगाव चौफुला पारगाव न्हावरा काष्टी दौंड- कुरकुंभमार्गे सोलापुर अशी वळविण्यात आली असून सर्व नागरीकांनी पालखी सोहळा काळात विना कारण प्रवास टाळावा. तसेच वरील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच पालखी मुक्काम व विसावा ठिकाणी दर्शनासाठी येताना चार चाकी व दुचाकी वाहने पार्कीग ठेवण्यात आलेल्या ठिकाणी व्यवस्थित पार्किंग करावी रोडवर वाहने लावु नयेत. पालखी सोहळ्यातील वारकरी व सर्वसामान्य नागरिकांनी सोन्या-चांदीचे दागदागिने घालणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा नागरीकांच्या मदतीसाठी पालखी मुक्काम ठिकाणी पोलीस मदत कक्षाची व्यवस्था करण्यात आली असनु आपातकालीन किंवा दुर्घटना घडल्यास मदतीसाठी डायल ११२ वर संपर्क साधावा असे पुणे ग्रामीण पोलीसांकडुन आषाढी वारी भाविकांना व वारक-यांना आवाहन करण्यात आले आहे. सदर पालखी सोहळा अनुषंगाने श्री.संदिप सिंह गिल्ल (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण) यांचे मार्गदर्शनाखाली व बंदोबस्त प्रभारी अधिकारी श्री.रमेश चोपडे (अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग पुणे ग्रामीण ), सहा. बंदोबस्त प्रभारी अधिकारी श्री.सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग व श्री.बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड उप विभाग) यांचे देखरेखीखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सपोनि पोसई पोलीस अंमलदार महिला अंमलदार होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष